
संजय राऊत यांनी नुकताच भाजपासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी म्हटले की, कालही बोलले ते परवाही बोलले ते की महाराष्ट्रात फक्त मराठीचीच सक्ती राहिल. इतर कोणत्याही भाषेची सक्ती राहणार नाही. या राज्याचा मुख्यमंत्री किती जास्त खोटं बोलतोय. काल नवी मुंबईच्या जाहिरनाम्यात भाजपाने हिंदी सक्तीची करू असे सांगितले. नवी मुंबईची भाषा काय मराठी नाहीये का? नवी मुंबई हे तेथील लोक मराठी, आग्री, कोळी यांनी बसवलेले हे शहर आहे. तेथील सिडको ठीक आहे हो… तुमचे गणेश नाईक त्या भागातील आहेत, मंदा म्हात्रे त्या भागातल्या आहेत, प्रशांत ठाकूर त्या भागातील आहेत. ठीक आहे भलेही आमचे आमदार नसतील. पण तो सर्व भाग मराठी असून बाकी सर्व लोक तिथे बाहेरून काम धंद्यासाठी आले आहेत. मुख्यमंत्र्यांना इतके हिंदीचे प्रेम असेल मग त्यांनी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात जाऊन निवडणूक लढवावी ना.
पुढे बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांना मोदी कुठेही मुख्यमंत्री करू शकतात. जम्मू काश्मीर किंवा लडाखलाही करू शकतात. पण आपल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनाच मराठी विषयी प्रेम आणि अस्था नाहीये. चार दिवसांपूर्वी ते वसई विरार महापालिकेच्या प्रचाराला ते गेले. त्यांचे भाषण ऐकून मला धक्का बसला कारण त्यांचे ते भाषण हिंदीमध्ये होते. वसई विरारची भाषा हिंदी कधी झाली?
वसई विरार हा मराठी भाग आहे बाकी बाहेरचे लोक असतील तिकडे. पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तिकडे जाऊन सांगतो की, वसई विरारची भाषा हिंदी आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांचं हिंदी लादण्याचा हा प्रयत्न आहे. चिमाजी आप्पाचे वसई विरार आहे हो… निदान त्या पेक्षव्यांचातरी मान राखायचा. तिथे जाऊन तुम्ही हिंदीत भाषणे करतात? नवी मुंबईत हिंदी सक्ती करता? मुंबई महाराष्ट्राबाहेर काढण्याचे कारस्थान यांचे ते सिद्ध करत आहेत.
काल आण्णा मलाई म्हणाला, आमच्या तोंडावर बॉम्बे बसला. संजय राऊत म्हणाले, अरे भडव्या… तुझ्या तोंडात बॉम्बे बसलंय तर मग तू जाना चेन्नईला.. इथे कशाला आहेत कोण आहे तू? आण्णा मलाई हा महाराष्ट्रात प्रचाराला आला.. त्याला रोखण्याचा इथे प्रश्न नाहीये..पण तुम्ही महाराष्ट्रात येऊन आमच्या मराठी बांधवांच्या भावनांशी खेळत आहात आणि राज्याचे मुख्यमंत्री त्याची रिळ ओढतात, असेही संजय राऊतांनी म्हटले.