AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडिलांच्या हत्येचा निकाल बाजूने लागण्यासाठी… ओमराजे निंबाळकरांवर दबाव, सहीसाठी… संजय राऊत यांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

पक्षफुटीच्या चर्चांवर संजय राऊत यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यादरम्यानच संजय राऊत यांनी गंभीर आरोप केली आहेत.

वडिलांच्या हत्येचा निकाल बाजूने लागण्यासाठी... ओमराजे निंबाळकरांवर दबाव, सहीसाठी... संजय राऊत यांच्या गौप्यस्फोटाने खळबळ
Eknath Shinde and Sushma Andhare
| Updated on: Jun 17, 2026 | 12:20 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटणार असल्याची चर्चा आहे. तशा हालचाली दिल्लीत सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आहे. काल त्यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. 6 खासदार स्वतंत्र गटाचे पत्र लोकसभा अध्यक्षांना देणार आहेत. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का म्हणावा लागेल. एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या या खासदारांसोबत बैठक घेतल्याचीही माहिती आहे. हे 6 खासदार दिल्लीत आहेत. दुसरीकडे पक्षफुटी टाळण्याकरिता शिवसेना ठाकरे गटाकडून व्हिप जारी करण्यात आले. संजय राऊतही दिल्लीत आहेत. मोठ्या घडामोडी घडत आहेत. जे 6 खासदार शिवसेना शिंदे गटात जात आहेत, त्यांची नावे पुढे आलीत. ओमराजे निंबाळकर यांच्याही नावाचा समावेश आहे संजय राऊत यांनी या पार्श्वभूमीवर दिल्लीत पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी अरविंद सावंत आणि अनिल देसाई देखील उपस्थित होते.

संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले. संजय राऊत यांनी म्हटले की, आम्ही कोणत्याही पक्षाचं आणि खासदाराचं नाव घेतलं नाही. देशात निवडून आलेल्या खासदारांना फोडणं हे लोकशाहीच्या विरोधी आहे. ओम बिर्ला यांनी कायद्यानुसार निर्णय घ्यावा. सुप्रीम कोर्टात निर्णय पेंडिंग आहे. याला सुप्रीम कोर्ट जबाबदार आहे. तुमच्या यादीत ओमराजेंचं नाव आहे. 20 वर्षा पूर्वी त्यांच्या वडिलांची हत्या झाली.

काल निकाल होता. आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार, ओमराजेंवर दबाव असा आहे की, तुमच्या बाजूने निकाल हवा असेल तर आमच्यासोबत या. हवा तसा निकाल देतो. दोन खून आहेत. पवनराजे आणि त्यांच्या ड्रायव्हरचा खून आहे. 20 वर्षानंतर काल निर्णय होणार होता. ओमराजेंना सांगितलं गेलं, एका व्यक्तीच्या माध्यमातून, जो नेता आज दिल्लीत आला आहे.

तुमच्या बाजूने निर्णय हवा असेल तर सही करा. आमच्यासोबत या. अशा प्रकारे या देशाचा कायदा चालत असेल तर काय संविधान, काय कायदा, काय हायकोर्ट तुम्हीच सांगा. त्यामुळेच दोन दिवसासाठी हा निकाल राखून ठेवला, असा मोठा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केले. संजय राऊत यांनी केलेल्या या आरोपानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं