Sanjay Raut: मी अमृतावहिनींसोबत…गरब्यात मुस्लिमांना प्रवेश न देण्याच्या मागणीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
Sanjay Raut: मंत्री नितेश राणे यांनी थेट गरब्यामध्ये लव्ह जिहाद व्हायला नको म्हणून, मुस्लिमांना थेट प्रवेशच नको असे म्हटले. आता या वादात अमृता फडणवीस यांनी जे स्पष्टपणे आपले मत मांडले यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदु सण साजरे करण्यावरुन अनेक वाद सुरु आहेत. सण-उत्सावरुन राज्यात राजकीय पक्ष एकमेकांच्याविरोधात बाजू मांडताना दिसत आहेत. दहीहंडी आणि गणेशोत्सवातील डीजे बंदी हे प्रकरण गाजत असताना आता गरबा, दांडियावरुन वाद सुरु झाला आहे. नुकतेच भाजप नेत्याने नवरात्रीबद्दल एक मोठे विधान केले. मंत्री नितेश राणे यांनी थेट गरब्यामध्ये लव्ह जिहाद व्हायला नको म्हणून, मुस्लिमांना थेट प्रवेशच नको असे म्हटले. आता या वादात अमृता फडणवीस यांनी जे स्पष्टपणे आपले मत मांडले यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवरात्री उत्सव सुरु व्हायला जवळपास एक महिना बाकी आहे. मात्र, तो सुरु होण्याआधीच महाराष्ट्रात गरबा-दांडियावरुन जोरदार राजकारण पेटले आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्यास विरोध केला. जर मुस्लिमांना गरब्यात यायचं असेल तर त्यासाठी थेट धर्मांतराची अट घालून दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मात्र या भूमिकेला तीव्र विरोध केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या सर्वावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. ‘आपला उत्सव सर्वांना सामावून घेतो. एखादा मुस्लिम व्यक्ती जर गरब्यात येत असेल आणि नीट आनंद घेऊन जात असेल तर त्यात गैर काय आहे?’ असे अमृता फडणवीस यांनी म्हटले.
संजय राऊत काय म्हणाले?
आता अमृता फडणवीस यांच्या भूमिकेवर संजय राऊत यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. संजय राऊत म्हणाले की, ” मी अमृता फडणवीस वहिनीसोबत आहे. त्यांची भूमिका अगदी योग्य आहे. तर तुम्ही फडणवीसांच्या लाडक्या बोगस हिंदुत्ववाद्यांचे काऊन्सिलिंग करा असा सल्लाही संजय राऊत यांनी अमृता फडणवीस यांना दिला आहे. जे यजमान आहे देवेंद्र फडणवीस त्यांच्या मंत्रीमंडळात जे टोळभैरव आहेत नवहिंदुत्ववादी त्यांना सांगायला हवं की हा महाराष्ट्र, हा देश बनवण्यामध्ये सर्व जातीय, धर्माच्या लोकांचे फार मोठे योगदान आहे.”