AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shweta Mahale : बाई बाप कसा होईल, गरज पडली तर पाचव्या मजल्यावरून..श्वेता महालेंना उत्तर देताना शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

Shweta Mahale : "महिलांचा सन्मान नाही तर अपमान करणारी गोष्ट आहे. ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी बापच नाही तर त्यापुढचा पण दाखवीन. तुम्ही काहीच काळजी करू नका, मी पण आमदार आहे. मी काही नुसता केबिन मध्ये घुसून धमक्या देणारा नाही. गरज पडली तर पाचव्या मजल्यावरून कार्यक्रम करून टाकीन" अशी भाषा संजय गायकवाड यांनी केली.

Shweta Mahale : बाई बाप कसा होईल, गरज पडली तर पाचव्या मजल्यावरून..श्वेता महालेंना उत्तर देताना शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
Shweta Mahale
| Updated on: Sep 09, 2026 | 9:55 AM
Share

गणेश सोलंकी, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यात स्थानिक वर्चस्वाच्या राजकारणावरुन पुन्हा एकदा महायुतीमधील दोन आमदारांमध्ये मतभेद तीव्र होत चालले आहेत. परस्परांवर शाब्दीक टीका करताना पातळी घसरत चालली आहे. नुकतचं चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. या शक्ती प्रदर्शनावेळी श्वेता महाले यांनी बाप तो बाप रहेगा या गाण्यावरुन तसच धनुष्यबाणाचा इशारा करुन संजय गायकवाड यांना डिवचलं. हा वाढदिवसाचा कार्यक्रम सुरु असताना काहीवेळासाठी लाईट गेली होती. त्यावरूनही आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आता आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युतर दिलं. पण त्यात काही वादग्रस्त वक्तव्यही केली. संजय गायकवाड यांनी सुद्धा मुलगा कुणाल गायकवाडचा वाढदिवस श्नेता महालेंच्या चिखलीमध्ये साजरा केला होता.

“मी कर्नाटकला असताना बुलढाण्यात कार्यक्रम झाला. कार्यक्रम कशासाठी तर कुणालचा वाढदिवस चिखलीत झाला म्हणून. एका लेकराला चॅलेंज देण्यासाठी बुलढाण्यात कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात माझा सहभाग शून्य होता. वाढदिवसाला 500 रुपये देऊन माणसं आणली” असा दावा संजय गायकवाड यांनी केला. “चपराशी पासून अधिकाऱ्यांपर्यंत पाच पाच फोन. आम्हाला भाड्याच्या माणसांची गरज नाही. कार्यक्रमात माझ्यावर टीका केली. लाईट गेली म्हणे, अर्धा अर्धा तास लाईट टिकती का?. शेतकऱ्यांना विचारा. तिथे लाईट गेली त्यात माझा काय दोष” असं संजय गायकवाड म्हणाले.

अख्ख बुलढाणा जाम करून टाकले

“मला जर विरोध करायचा असता तर मी धाड नाक्यावर फौज उभी केली असती तर सगळे मागच्या मागे गायब झाले असते. त्यादिवशी पोलीस बांधवांना दिवसभर चौकाचौकात ताटकळत ठेवले” असं संजय गायकवाड म्हणाले. “काय तर vip मुव्हमेंट आहे. एक बिडीओ लेव्हलचा अधिकारी,खाजगी सचिव आणि vip मुव्हमेंट. अख्ख बुलढाणा जाम करून टाकले. एम्बुलन्सलाही जगा दिली नाही. चौका चौकात जेसीबी उभ्या करून लोकांना त्रास दिला” असं संजय गायकवाड म्हणाले.

तुम्ही कार्यक्रमाला आले तर कचरा आहे का

“म्हणतात बुलढाण्याचा कचरा चिखलीत आला. तुम्ही कार्यक्रमाला आले तर कचरा आहे का, हे शिवसेनेचे भगवे वादळ आहे. तुम्ही आम्हाला कचरा म्हणता मी cm, dcm यांच्या मंत्रिमंडळातील दमदार आमदार आहे. आम्ही जे केले ते करून दाखवा . गोरगरीब लेकरांना तडीपार करायचे काम करू नका, खोट्या केसेस करू नका. चांगल्या मार्गाने देखील तुम्ही लोकांची कामे करू शकता” असं संजय गायकवाड म्हणाले.

बाई बाप कसा होईल

“लोकांना जेवण ठेवले तर जेवायला पण कुणी गेले नाही. वाढदिवसाला दोन चार कोटी खर्च करता, दुसरीकडे आमचे शेतकरी मरतोय, आत्महत्या करतो, दुष्काळ आहे, शेतकरी विवंचनेत असताना कोट्यवधी वाढदिवसाला खर्च करता. बाप तो बाप होता है म्हटले, बाई बाप कसा होईल. ईश्वराने दोनच जाती घडवल्या पुरुष आणि स्त्री.आम्ही स्त्रीला देवी, आई समना पाहतो, चामुंडा समजतो. बाप तो बाप ची भाषा करणारे, म्हणजे नारिजातीचा अपमान करणारी जात आहे” अशी टीका संजय गायकवाड यांनी केली.

Follow Us
ओबीसी आरक्षण संपल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगणार! हाकेंची मोठी घोषणा
Laxman Hake | ओबीसी आरक्षण संपल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगणार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; पुढे म्हणाले...
धनंजय मुंडे यांचं थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र; नेमकं कारण काय?
Dhananjay Munde | धनंजय मुंडे यांचं थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र; नेमकं कारण काय?
मुंबईतील नगरसेवकांना मोठी खुशखबर! 12 वर्षांनंतर निधीत भरघोस वाढ...
Corporator's Funds | मुंबईतील नगरसेवकांना मोठी खुशखबर! 12 वर्षांनंतर निधीत भरघोस वाढ; 60 लाखांऐवजी आता मिळणार तब्बल...
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर रोहित पवारांचं मोठं विधान!
Rohit Pawar | राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर रोहित पवारांचं मोठं विधान! अजितदादांच्या गटाने भाजपची साथ सोडली तर...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात 35% कमी पाऊस...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात 35% कमी पाऊस; सरकारचा मोठा निर्णय
राहुल गांधींच्या विमानाला लँडिंगवेळी तांत्रिक अडचण! पहिला प्रयत्न फसला
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या विमानाला लँडिंगवेळी तांत्रिक अडचण! पहिला प्रयत्न फसला; दुसऱ्या प्रयत्नात विमान सुखरूप उतरलं
मराठा आरक्षणाच्या मागणीने लातूरमध्ये तणाव! जरांगेंच्या एका फोननंतर...
Latur | मराठा आरक्षणाच्या मागणीने लातूरमध्ये तणाव! जरांगेंच्या एका फोननंतर नेमकं काय घडलं?
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...