AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांचे ओएसडी आणि फोटोग्राफर यांच्या विमानात तांत्रिक बिघाड, थेट लंडनला जाण्याऐवजी..

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसीय लंडन दाैऱ्यावर आहेत. ब्रिटिश संसदेत 9 आणि 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या दोन विशेष कार्यक्रमांमध्ये त्यांचा तीन विविध पुरस्कारांनी सन्मान होणार आहे. यादरम्यानच एक धक्कादायक घटना घडली.

मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांचे ओएसडी आणि फोटोग्राफर यांच्या विमानात तांत्रिक बिघाड, थेट लंडनला जाण्याऐवजी..
Eknath Shinde's London Visit
| Updated on: Sep 09, 2026 | 9:54 AM
Share

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसीय लंडन दौऱ्यासाठी रवाना झाले असून ब्रिटिश संसदेत 9 आणि 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या दोन विशेष कार्यक्रमांमध्ये त्यांचा तीन विविध पुरस्कारांनी सन्मान होणार आहे. यादरम्यानच एक मोठी माहिती पुढे येतंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी आणि फोटोग्राफर यांची फ्लाईट डायव्हर्ट करण्यात आले. हिथ्रोचा ऐवजी झ्युरीकला विमान गेले… विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आहे. लंडनमध्ये सकाळी साडेपाच वाजले असता सात वाजता यांची लंडनला नेण्याची सोय करण्यात येणार असल्याची माहिती मिळतंय. लंडनऐवजी विमान स्वित्झर्लंडला पोहोचले. अचानक झालेल्या टेक्निकल बदलामुळे मुंबईतून पुरस्कारासाठी गेलेल्या उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना याचा फटका बसल्याची माहिती मिळत आहे. सहा अधिकारी झ्युरिकला अडकले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ब्रिटिश एयरवेजचा विमानात असून त्यांची फ्लाईट वेळेत असल्याची माहिती मिळतंय. मात्र, त्यांच्या ओएसडी आणि फोटोग्राफरचे फ्लाईट डायव्हर्ट झाले.

9 सप्टेंबर 2026  रोजी हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि कॅनव्हास फॉर केअरतर्फे त्यांना कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन पुरस्कार प्रदान करण्यात येईल. उत्तर आयर्लंडच्या माजी फर्स्ट मिनिस्टर बॅरोनेस आर्लेन फॉस्टर आणि यूके एशियन बिझनेस कौन्सिलचे चेअरमन अँड्र्यू ग्रोकॉक यांच्या वतीने उपाध्यक्ष सुदीप सकाळे यांनी उपमुख्यमंत्र्यांना या सोहळ्याचे विशेष निमंत्रण दिले आहे.

शिंदेंच्या कार्यकाळातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ यांसारख्या लोककल्याणकारी व पारदर्शक उपक्रमांची दखल घेऊन हा सन्मान दिला जात आहे. हाऊस ऑफ लॉर्ड्समधील सोहळ्यात संसदीय कला प्रदर्शन आयोजित केले असून यात ब्रिटनमधील मुलांनी महाराष्ट्रातील लाडकी बहीण आणि ‘शासन आपल्या दारी योजनांच्या संकल्पनेवर आधारित काढलेली चित्रे प्रदर्शित केली जातील.

10 सप्टेंबर 2026 रोजी इंडो-युरोपियन बिझनेस फोरम आणि वर्ल्ड लीडरशिप फोरमद्वारे हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आयोजित इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह 2026: ग्लोबल बिझनेस अँड इन्व्हेस्टमेंट डायलॉगमध्ये शिंदे मुख्य अतिथी म्हणून सहभागी होतील. हाऊस ऑफ कॉमन्समधील या परिषदेत उपमुख्यमंत्र्यांना ‘स्टेटस्मनशिप अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात येणार असून, ते महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन आणि भारत-यूके आर्थिक संबंधांवर मार्गदर्शन करतील.

Follow Us
ओबीसी आरक्षण संपल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगणार! हाकेंची मोठी घोषणा
Laxman Hake | ओबीसी आरक्षण संपल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगणार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; पुढे म्हणाले...
धनंजय मुंडे यांचं थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र; नेमकं कारण काय?
Dhananjay Munde | धनंजय मुंडे यांचं थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र; नेमकं कारण काय?
मुंबईतील नगरसेवकांना मोठी खुशखबर! 12 वर्षांनंतर निधीत भरघोस वाढ...
Corporator's Funds | मुंबईतील नगरसेवकांना मोठी खुशखबर! 12 वर्षांनंतर निधीत भरघोस वाढ; 60 लाखांऐवजी आता मिळणार तब्बल...
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर रोहित पवारांचं मोठं विधान!
Rohit Pawar | राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर रोहित पवारांचं मोठं विधान! अजितदादांच्या गटाने भाजपची साथ सोडली तर...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात 35% कमी पाऊस...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात 35% कमी पाऊस; सरकारचा मोठा निर्णय
राहुल गांधींच्या विमानाला लँडिंगवेळी तांत्रिक अडचण! पहिला प्रयत्न फसला
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या विमानाला लँडिंगवेळी तांत्रिक अडचण! पहिला प्रयत्न फसला; दुसऱ्या प्रयत्नात विमान सुखरूप उतरलं
मराठा आरक्षणाच्या मागणीने लातूरमध्ये तणाव! जरांगेंच्या एका फोननंतर...
Latur | मराठा आरक्षणाच्या मागणीने लातूरमध्ये तणाव! जरांगेंच्या एका फोननंतर नेमकं काय घडलं?
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...