विनायक राऊतांच्या सूनेचा कौटुंबिक छळाचा आरोप; संजय राऊत म्हणाले, ‘सगळं संशयास्पद, कारण…’

Sanjay raut on vinayak raut : संजय राऊत यांनी विनायक राऊत यांच्यावर झालेल्या आरोपावर मोजक्या शब्दात भाष्य केलं. त्यांनी या प्रकरणावर संशय व्यक्त केला.

विनायक राऊतांच्या सूनेचा कौटुंबिक छळाचा आरोप; संजय राऊत म्हणाले, सगळं संशयास्पद, कारण...
| Updated on: Jul 12, 2026 | 1:22 PM

ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा नगरसेवक गितेश राऊत यांच्यासह संपर्ण राऊत कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. विनायक राऊतांची सून यांनी ठाण्यातील कापूरपबावडी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर विनायक राऊत यांच्या कुटुंबावर कौटुंबिक छळासह जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची बाब ही संशयास्पद आहे, अशी पहिली प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. तर विनायक राऊत यांच्या कुटुंबावर झालेल्या आरोपावर संजय राऊत म्हणाले, ‘विनायक राऊत यांच्या कुटुंबातील मला माहीत नाही. त्यावर तेच बोलतील. ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयास्पद आहे. त्याचं कारण असे गुन्हे ठाण्यातच दाखल होऊ शकतात. मला यावर अधिक काही बोलायचं नाही’.

टीसीला मराठीत बोलण्याची सक्ती केल्यानंतर एका प्रवाशाला एक तास बंदिस्त ठेवण्यात आलं. या प्रकरणावर संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्‍यांना टार्गेट केलं. राऊत म्हणाले, ‘फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते वारंवार बोलत असतात. अधूनमधून हिंदीत बोलत असले तरी महाराष्ट्रात मराठी सक्ती आहे हे विधान ते जोरात करतात. मग मराठी माणसाला त्रास का होतो’.

ओमर अब्दुल्ला यांच्या भाजपवरील गंभीर आरोपावर संजय राऊत म्हणाले, ‘तामिळनाडूचं सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला. ३५ कोटी रुपये देण्याचं आमिष दाखवलं. महाराष्ट्रात, पश्चिम बंगालमध्ये तेच झालं. जम्मू काश्मीरमध्येही भाजप हे उपदव्याप करत असेल तर हे देशविघातक कृत्य आहे. तिथे शांतता पाहिजे. काश्मीर आणि पंजाबमध्ये ते असं करत असेल तर त्यांना देशाच्या शांतता आणि सुरक्षेची अजिबात चिंता नाही’. तत्पूर्वी, संजय राऊत यांनी राम मंदिरातीलदेणगी गैरव्यवहारांवरावरून भाजपवर टीका केली. ‘सीसीटीव्ही कॅमेऱ्यापासून भ्रष्टाचार आहे. रस्ते सोडून द्या. साडे तीनशे कोटीचा भ्रष्टाचार असून मी लवकरच माहिती देणार आहे. हिंदू धर्माच्या नावाने पैसा खाल्ला जातोय. यांना लाज वाटली पाहिजे. चंपत राय अयोध्येत नसून भाजपचं जिथे जिथे राज्य आहे, तिथे असे चंपत राय आहेत, असा आरोप राऊत यांनी केला.

Follow Us