AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे आता मुजरा पण करतील… संजय राऊतांचा टोला

एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील कार्यक्रमात "जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात" असे म्हटल्याने वाद निर्माण झाला. यावर संजय राऊत यांनी शिंदे यांच्यावर तीव्र टीका केली आहे. राऊत यांनी शिंदे यांना सत्तेत राहण्यासाठी अमित शहांच्या आशीर्वादाने मुजरा करावा लागत असल्याचा टोला लगावला.

एकनाथ शिंदे आता मुजरा पण करतील... संजय राऊतांचा टोला
संजय राऊत यांचा शिंदेंना खोचक टोला
| Updated on: Jul 05, 2025 | 10:29 AM
Share

शिवसेना शिंदे गटाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमावेळी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात असे म्हटले होते. यावरुन मोठा गदारोळ झाला होता. आता यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. मुशायरा शायरी सोडा, जर सत्तेत राहायचं असेल अमित शाहांच्या आशीर्वादाने तर मुजरा करावा लागेल, असा खोचक टोला संजय राऊतांनी केला.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यात जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरचा उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. या भाषणात म्हणाले, ‘या वास्तूचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांनी केले आणि लोकार्पण अमित शहा यांनी केले. मोदींनी हाती घेतलेले काम नेहमीच पूर्णत्वास जाते. अमित शाह हे देशसेवेसाठी समर्पित आहेत राज्याच्या प्रगतीमध्ये तुमचा वाटा आहे. यानंतर भाषण संपवताना एकनाथ शिंदे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा दिली होती.

यानंतर एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिले. ‘पुण्यातील गुजराती बांधवांनी एक कॉम्प्लेक्स उभारलं आहे. याचं आज लोकार्पण करण्यात आले. माझ्या भाषणाच्या शेवटी मी जय हिंद, जय महाराष्ट्र असं म्हणतो. जय हिंद म्हणजे देशाच्या अभिमान, जय महाराष्ट्र म्हणजे राज्याचा अभिमान. आज पुण्यातील गुजराती लोकांसाठी कार्यक्रम होता. गुजराती लोकांनी महाराष्ट्राला कर्मभूमी मानली आहे, त्यामुळे मी शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात असं म्हटलो.’ असे एकनाथ शिंदे म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले?

त्यावर आता संजय राऊत यांनी टीका केली आहे. एकनाथ शिंदे हे अमित शाहांसाठी आता मुशायराही करु शकतात. ते मुजराही करु शकतात. सध्या त्यांचा मुजरा सुरु आहे. शायरी काय ते सहज दिसली म्हणून वाचतात. मी त्यांना ओळखतो. त्यांना साधी मराठी कविताही बोलता येत नाही. मुशायरा शायरी जर सत्तेत राहायचं असेल अमित शाहांच्या आशीर्वादाने तर मुजरा करावा लागेल. करु द्या, असे संजय राऊत म्हणाले.

Follow Us
काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! झारखंड सरकारमधील बड्या मंत्र्याचे निधन,
काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! झारखंड सरकारमधील बड्या मंत्र्याचे निधन, कारण...
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर