Sanjay Raut : आजच्या रामरक्षा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी वांगचुक यांना हटवलं – संजय राऊत कडाडले

राजधानी दिल्लीत गेल्या 21 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना अचानक हटवण्यात आले. यावर संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया देत, ही सरकारची दडपशाही असल्याचे म्हटले. नागपूरमधील रामरक्षा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठीच हा प्रकार घडवून आणल्याचा गंभीर आरोपही राऊतांनी केला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

Sanjay Raut : आजच्या रामरक्षा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी वांगचुक यांना हटवलं - संजय राऊत कडाडले
संजय राऊत यांची सरकारवर कडाडून टीका
| Updated on: Jul 18, 2026 | 10:15 AM

NEET परीक्षेतील (NEET Paper Leak Case) फेरफार आणि अनियमिततेच्या निषेधार्थ आणि विविध मागण्यांसाठी गेल्या 21 दिवसांपासून राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज अचानक आंदोलन स्तळावरून हटवण्यात आलं. आज सकाळीच साध्या वेषातील दिल्ली पोलीस आंदोलनस्थळी दाखल झाले आणि त्यांनी सोनम वांगचूक यांना तेथून रुग्णालयात दाखल केलं. जंतरमंतरवर बराच गोंधळ माजला असून तेथे मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. त्यानंतर विविध प्रतिक्रिया समोर येत असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनीही यावरून सरकारवर टीका केली आहे. वांगचुक यांना आंदोलनस्थालवारून हटवणं ही सरकारची दडपशाही आहे, अशी टीका राऊतांनी केली. एवढंच नव्हे तर आज नागपूरमध्ये शिवनसेनेचं रामरक्षा आंदोलन आहे, त्यावरून लक्ष हटवण्यासाठी देखील वांगचुक यांना हटवण्यात आलं असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या विधानानंतर मोठी खळबळ माजली आहे.

काय म्हणाले संजय राऊत ?

ही दडपशाहीच आहे. ज्या प्रश्नासाठी सोनम वांगचुक यांनी 21 दिवस उपोषण सुरू ठेवलं, त्या प्रश्नाचा निकाल लावला नाही. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी त्यांचं उपोषण सुरू होतं. त्यांचा राजीनामा घेतला नाही. आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी प्राणांची कुर्बानी देण्यास तयार असलेल्या वांगचुक यांना पोलिसांनी जोरजबरदस्तीने उचलून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. हा देश किती हुकूमशाही मार्गाने चाललाय. वांगचुक यांच्या प्राणाची तुम्हाला इतकी किंमत असती, तर  उपोषण सुरू झाल्यावर काही काळातच त्यांच्या मागण्यांसदर्भात सरकारने काही भूमिका घेतली असती. ती भूमिका घेतली नाही, असं राऊतांनी सुनावलं.

रामरक्षा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी सरकारचा डाव – राऊतांचा आरोप

सोनम वांगचूक यांच्यावर दडपशाही करण्याचं दुसरं कारण म्हणजे, आज नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राममंदिर लुटीविरोधात जो एल्गार पुकारण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमावरचं लक्ष वळवावं, म्हणूनही सोनम वांगचूक यांना दडपशाही मार्गाने अटक करून हॉस्पिटलमध्ये नेलं, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

तरीही आज उद्धव ठाकरे निघााले आहेत, ते 12 वाजता नागपूरला पोहोचतील आणि 4 वाजता ते रामनगर, राममंदिर येथे रवान होतील, असं राऊतांनी नमूद केलं.

Follow Us