AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जितेंद्र आव्हाड संतापले, म्हणाले ‘परळीला स्वतंत्र राष्ट्र घोषित करा, अन् धनंजय मुंडेंना…’

आज वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली, यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे.

जितेंद्र आव्हाड संतापले, म्हणाले 'परळीला स्वतंत्र राष्ट्र घोषित करा, अन् धनंजय मुंडेंना...'
| Updated on: Jan 14, 2025 | 5:58 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराडपूर्वी आठ जणांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र वाल्मिक कराड याच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी देशमुख कुटुंबाकडून सुरू होती. अखेर आज वाल्मिक कराड याच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले आव्हाड? 

वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, यावर प्रतिक्रिया देताना 307 देखील दाखल करा अशी मागणी यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. पुढे बोलताना त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंना देखील टोला लगावला आहे. परळीला स्वतंत्र राष्ट्र घोषित करा आणि  धनंजय मुंडेंना तेथील पंतप्रधान घोषित करा. धनंजय मुंडेंचा राजीनामा क्रमप्राप्त होता. असा टोलाही यावेळी आव्हाड यांनी लगावला आहे. दरम्यान अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल का घेतली नाही? असा सवालही त्यांनी यावेळी केला. परळीत अजूनही अनेक पोलीस अधिकारी वाल्मीक कराड यानेच नेमलेले आहेत, असा आरोपीही यावेळी आव्हाड यांनी केला आहे.

वातावरण तापलं

वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर परळीमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. परळीमध्ये आज सकाळपासूनच वाल्मिक कराड याच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू होतं. या आंदोलनात वाल्मिक कराड याची आई देखील सहभागी झाली होती. मात्र आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती खालावली, पाण्याच्या टाकीवर चढून समर्थकांनी आंदोलन केलं.

त्यानंतर वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आल्याची बातमी समोर येताच समर्थक आधिक आक्रमक झाले. बेमुदत परळी बंदची हाक देण्यात आली आहे, टायर जाळून निषेध करण्यात आला. तसेच आंदोलकांकडून बसवर देखील दगडफेक करण्यात आली आहे.  यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे, आता उद्या वाल्मिक कराड याला केज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Follow Us
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?