AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार? कराडचा कोर्टात अर्ज कशासाठी? काय केला दावा?; उज्जवल निकम यांनी दिली मोठी माहिती

संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ, तो आरोपींनीच काढला होता असं सीआयडीच्या तपासात दिसून आलं होतं. आणि तो सीलबंद परिस्थितीत, फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आला होता. तो बाहेर प्रसिद्ध झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून या व्हिडीओला कोणत्याही प्रकारे बाहेर प्रसिद्धी मिळू नये अशी विनंती आम्ही न्यायालयाकडे केली, असे उज्ज्वल निकम यांनी सांगितलं.

वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार? कराडचा कोर्टात अर्ज कशासाठी? काय केला दावा?; उज्जवल निकम यांनी दिली मोठी माहिती
उज्ज्वल निकमImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 10, 2025 | 1:29 PM
Share

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता जवळपास चार महिने उलटून गेले आहेत. या हत्याप्रकरणी आज कोर्टात सुनावणी झाली असून आता पुढील सुनावणी ही 24 तारखेला होणार आहे. आजच्या सुनावणीनंतर या केसमधील विशेष सरकारील वकील उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी संवाद साधला. आरोपी वाल्मिक याची चल आणि अचल स्थावर मिळकत जप्त करण्यात यावी असा अर्ज कोर्टात केल्याचे त्यांनी नमूद केलं. दरम्यान आजच्या सुनावणीमध्ये अत्यंत महत्त्वाची घडामोड घडली आहे. या हत्येचा मुख्य सूत्रधार आणि आरोपी वाल्मिक कराडने कोर्टात अर्ज दाखल केला असून आपण निर्दोष असल्याचा, या खुनाशी काहीही संबंध नसल्याचा दावा त्याने केला आहे, असे उज्ज्वल निकम यांनी सांगितलं.

मी निर्दोष , खुनात सहभाग नाही – वाल्मिकचा कोर्टात अर्ज

वाल्मिक कराडने त्याच्या अर्जात अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. माझा या प्रकरणात कुठेही काहीही संबंध नाही, मी खुनामध्ये नाही, खंडणी मी मागितली नाही, मी कसा निर्दोष आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न त्याने कोर्टात दाखल केलेल्या अर्जामध्ये होता, असे उज्ज्वल निकम यांनी सांगितलं.

दरम्यान आरोपी वाल्मिक याची चल आणि अचल स्थावर मिळकत जप्त करण्यात यावी असा अर्ज आम्ही न्यायालयात दिला असून त्यावर वाल्मिकतर्फे कोणताही खुलासा दाखल करण्यात आलेला नाही. त्यावर पुढे रीतसर सुनावणी होईल. त्यामुळे आता वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होते का, कोर्ट काय आदेश देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काय म्हणाले उज्ज्वल निकम ?

वाल्मिक कराडने कोर्टाकडे खटल्याशी संबंधित कागदपत्रांची मागणाी केली होती. ती सगळी कागदपत्रं सीआयडीमार्फत न्यायालयात सादर करण्यात आली. आरोपीच्या वकिलांना कागदपत्र, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस दिले. देशमुख हत्या आणि खंडणीच्या प्रकरणात आपला संबंध नाही, हे दाखवण्याचा वाल्मिकचा प्रयत्न सुरू आहे. त्यावर येत्या 24 तारखेला सीआयडीचं म्हणणं न्यायालयात सादर केलं जाईल, त्यानंतर त्यावरती सविस्तर सुनावणी होईल.

मारहाणीचा व्हिडीओ बाहेर आल्यास कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल

आज न्यायालयामध्ये आम्ही जी कागदपत्र सादर केली, त्यातील प्रत्यक्ष संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ, तो आरोपींनीच काढला होता असं सीआयडीच्या तपासात दिसून आलं होतं. आणि तो सीलबंद परिस्थितीत, फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आला होता. तो संपूर्ण व्हिडीओ आम्ही न्यायलयात हजर केला , पण या व्हिडीओला कोणत्याही प्रकारे बाहेर प्रसिद्धी मिळू नये अशी विनंती आम्ही न्यायालयाकडे केली आहे. तो बाहेर आल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

म्हणून मकोका कायद्याच्या तरतुदी अंतर्गत आम्ही न्यायालयाला ही विनंती केली आहे. त्यावर न्यायालयाने सर्व आरोपींचं म्हणणं मागितलं आहे. आणि त्यांचं म्हणणं हे 24 तारखेला न्यायालयासमोर सादर करण्यात येईल, तेव्हा यासंबंधी सुनावणी होईल, असे निकम यांनी सांगितलं.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.