
फलटण शासकीय रूग्णालयात कार्यरत महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येला राजकीय वळण लागले असून गंभीर आरोप केली जात आहेत. संपदा मुंडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक नोट तळहातावर लिहिली. मात्र, आता वेगळाच संशय व्यक्त केला जात आहे. संपदा मुंडे यांनी राहत असलेल्या घरात आत्महत्या न करता एका हॉटेलमध्ये केली. मात्र, ही हत्या की, आत्महत्या यावरून विविध चर्चा सुरू आहेत. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणात एसआयटीच्या स्थापना करावी, अशी मागणी केलीये. मात्र, सरकारकडून त्यासंदर्भातील कोणती पाऊले उचलली जात नाहीत. एका बड्या नेत्याचे नाव या प्रकरणात आल्याने विरोधी पक्षांकडून आरोप केली जात आहेत.
संपदा मुंडे यांनी आत्महत्या करण्याच्या अगोदर हातावरील नोटमध्ये पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांची नावे लिहून आरोप केली होती. दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र, आरोपी प्रशांत बनकर यांच्या कुटुंबियांनी मुलाखतीमध्ये बोलताना स्पष्टपणे सांगितले होते की, आम्ही पीएसआय गोपाळ बदने याला ओळखत नाहीत, त्याची आणि आमची ओळख कोणत्याही प्रकारची नाही.
ज्यावेळी पीएसआय बदने आणि प्रशांत बनकर यांची नावे संपदा मुंडे यांनी हातावर लिहिली होती, त्यावरून बदने आणि बनकर एकमेकांना ओळखतात का? यावर प्रश्न प्रशांत बनकरच्या कुटुंबियांना विचारण्यात आला होता. मात्र, त्यांनी याला स्पष्टपणे नकार दिला. आता मुख्य आरोपी पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांचे कनेक्शन पुढे आले असून दोघेही एकमेकांच्या संपर्कात होती. फक्त संपर्कातच नाही तर संपदा मुंडेने आत्महत्या करण्याच्या अगोदर दोघांमध्ये संवाद देखील झाला होता.
धक्कादायक म्हणजे दोघांनीही नेहमीच्या फोनवर चर्चा न करता व्हॉट्सअॅप कॉलवर संवाद साधला होता. अधिक माहिती अशी की, दोघे एकमेकांच्या संपर्कात होती आणि त्यांचे यापूर्वीही फोनवर बोलणे झाले आणि ते मेसेजच्या माध्यमातूनही एकमेकांच्या संपर्कात होती. संपदा मुंडे यांच्याबद्दल दोघांमध्ये नेमका काय संवाद झाला हे मोठं गूड आहे. हेच नाही तर संपदा मुंडे प्रकरणात रणजितसिंह निंबाळकर यांची कसून चौकशी व्हावी, अशीही मागणी आता केली जात आहे.