Special Report : उदयनराजे भोसले यांनी 3 वेळा भूमिका मांडली, आता थेट 3 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम

| Updated on: Nov 30, 2022 | 11:20 PM

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलून, राज्यपाल कोश्यारींना 12 दिवस झालेत. पण अजूनही त्यांच्या राज्यपाल पदावरुन न हटवल्यानं खासदार छत्रपती उदयनराजे संतापलेत.

Special Report : उदयनराजे भोसले यांनी 3 वेळा भूमिका मांडली, आता थेट 3 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम
Follow us on

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावरुन, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दोन आठवडे झालेत. पण अजूनही ते पदावर कायम आहेत. त्यामुळं खासदार उदयनराजे भोसले यांनी आता अप्रत्यक्षपणे 3 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटमच दिलाय. लढणार आणि दाखवून देणार, असा इशाराच उदयनराजेंनी दिलाय. उदयनराजेंनी आता थेट लढण्याचीच भाषा केलीय. राज्यपाल कोश्यारींवर कारवाई करा, नाही तर 3 तारखेनंतर ठरवू, असा अप्रत्यक्ष इशाराच उदयनराजेंनी भाजपला दिलाय.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलून, राज्यपाल कोश्यारींना 12 दिवस झालेत. पण अजूनही त्यांच्या राज्यपाल पदावरुन न हटवल्यानं खासदार छत्रपती उदयनराजे संतापलेत.

19 नोव्हेंबरला, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी, औरंगाबादमध्ये शिवरायांबद्दल वक्तव्य केलं. त्यानंतर उदयनराजेंनी पत्रकारांसमोर 3 वेळा भूमिका मांडल्यात.

राज्यपाल कोश्यारींनी, शिवाजी महाराजांना जुन्या काळातले आदर्श म्हटल्यानंतर 21 नोव्हेंबरला, उदयनराजे संतापले. आणि राज्यपालांना थेट वृद्धाश्रमात पाठवा, अशी टीका केली.

राज्यपालांना महाराष्ट्रात ठेवू नका, असं स्पष्टपणे उदयनराजे बोलले. यानंतर उदयनराजेंनी शिवप्रेमी संघटनांसोबत 28 नोव्हेंबरला पुण्यात बैठक घेतली. तसेच केंद्रीय नेतृत्वालाही इशारा दिला आणि पुन्हा राज्यपालांसह भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदीची हकालपट्टी करण्याची मागणी केली. याच पत्रकार परिषदेत उदयनराजेंना अश्रूही अनावर झाले.

आता पुन्हा एकदा, उदयनराजेंनी अप्रत्यक्षपणे 3 डिसेंबरचा अल्टिमेटम दिलाय. 3 डिसेंबरला उदयनराजे शिवप्रेमींसोबत रायगडावर जनआक्रोश करणार आहेत. त्यामुळं तोपर्यंत राज्यपालांवर कारवाई करा, अशी उदयनराजेंना वाटतंय.

उदयनराजे, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. त्यामुळं शिवरायांबद्दलच्या वक्तव्यावरुन उदयनराजे काय भूमिका घेतात, याकडे महाराष्ट्राचं लक्ष होतंच. आणि अजून तरी उदयनराजे राज्यपालांवर कारवाईच्या मागणीसाठी ठाम आहेत.