नरेंद्र मोदी उमेदवार असूनही देशभरात सरकारी पैशाने जाहिरात केली जातेय; पृथ्वीराज चव्हाणांचा आक्षेप

Prithviraj Chavan on PM Narendra Modi and Loksabha Election 2024 : मोदी हे उमेदवार असून त्यांच्या नावाने सध्या देशभरात सरकारी पैशाने जाहिरात केली जात आहे. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे, असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय. वाचा सविस्तर...

नरेंद्र मोदी उमेदवार असूनही देशभरात सरकारी पैशाने जाहिरात केली जातेय; पृथ्वीराज चव्हाणांचा आक्षेप
Follow us
| Updated on: Mar 06, 2024 | 3:44 PM

सातारा | 06 मार्च 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात विरोधकांकडून नरेंद्र मोदी आणि भाजपवर गंभीर आरोप होताना दिसत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केलेत. सध्या देशभरात मोदी की गॅरंटी अशी केंद्रातून जाहिरात सुरू आहे. ही जाहिरात केंद्र सरकारच्या नावाने केली तर आपण समजू शकतो. मात्र मोदी एक उमेदवार आहेत त्यांचा प्रचार सरकारी पैशाने करणे हे योग्य नाही. याविषयी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवणार आहोत. याविषयी कारवाई होईल का नाही माहित नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

निवडणुकीचे संचालन करणारी सर्वात मोठी यंत्रणा म्हणजे निवडणूक आयोग… मात्र कुठल्याही यंत्रणेला स्वायत्त काम करून द्यायचं नाही. आपल्या दावणीला बांधल्यासारखं या यंत्रणांचा वापर करायचा. रशिया चीन मध्ये जशी घटना बदलली गेलीय आता भारतात काम केलं जातंय, यामुळे महागाई बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार हे राष्ट्रीय पातळीवरचे प्रमुख इंडिया आघाडीचे मुद्दे असणार आहेत, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.

सावध राहण्याची गरज- चव्हाण

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यामुळे कर्नाटक आणि तेलंगणाची निवडणूक यशस्वी झाली आहे. महाराष्ट्रात ज्या घडामोडी सुरू आहेत त्या सर्व नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने सुरू आहे. यामध्ये स्थानिक नेत्याचा समावेश नाही. नेत्यांना धमकी देऊन पक्षांतर करायला भाग पाडणं, तुरुंगात टाकायचं चार शीट फाईल करायची नाही. यासाठी सावध राहण्याची गरज आहे, असंही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.

सत्ताधाऱ्यांना आवाहन

महाराष्ट्र हे दोन नंबरचं राज्य आहे. या ठिकाणी पक्षांना फोडायचं आणि विरोधी पक्षात काही दम राहिला नाही, असं सांगायचं काम सत्ताधारी करत आहेत. मात्र जनतेला आमचं आवाहन आहे की, आमच्या राजकीय पक्षांच्या जरी काही चुका झाल्या असतील तर त्याची शिक्षा भारताच्या जनतेला आणि भावी पिढीला देऊ नका. ही निवडणूक जनतेने हातात घेण्याची गरज आहे. संविधान वाचवण्याचे गरज आहे. आमच्या अपयशाची शिक्षा भावी पिढीला देऊ नका, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुतीला आवाहन केलं आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.