AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसआयटी रात्रभर घरी; मुलाची 4 तास चौकशी, खासदार बजरंग सोनवणे भावुक, म्हणाले सौरवने बालपणापासून…

विलास घुले प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवे याची तब्बल चार तास एसआयटीकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर सोनवणे चांगलेच भावुक झाल्याचे पहायला मिळाले.

एसआयटी रात्रभर घरी; मुलाची 4 तास चौकशी, खासदार बजरंग सोनवणे भावुक, म्हणाले सौरवने बालपणापासून...
Bajrang SonawaneImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 27, 2026 | 5:10 PM
Share

बिड जिल्ह्यातल्या केजमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती, दोन गटातील भांडणं मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणावरच धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला, या हल्ल्यात विलास घुले या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. विलास घुलेच्या हत्येमुळे राज्यात आता वातावरण चांगलंच तापलं आहे.  या प्रकरणात बिडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावर देखील आरोप करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता एसआयटीकडून बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर बजरंग सोनवणे चांगलेच भावुक झाल्याचे पहायला मिळाले.

नेमकं काय म्हणाले सोनवणे? 

‘ सत्य परेशान हो सकता  है लेकीन पराजित नही, आम्ही चौकशीत पूर्णपणे सहकार्य करणार आहोत. एसआयटी रात्रभर माझ्या घरी होती. माझ्या कुटुंबाला यातून जावं लागतंय, पण हा चौकशीचा भाग आहे. हा नियम आता जिल्ह्यात लागु झाला आहे. इतर पुढाऱ्यांच्या घरी असंच घडलं तर वाईट वाटु नये. कारण आता सुरुवात झाली आहे. कमी वयामध्ये माझ्या मुलाला चार तास एसआयटीसमोर जबाब द्यावा लागला.  मी वडील म्हणून कमी पडलो पण लोकप्रतिनिधी म्हणून तपासासाठी सहकार्य करणं हे माझं कर्तव्य आहे. दररोज वेगळा आरोप होत आहे. कधी गाडी दिली असं म्हणतात, कधी तो गाडीत होता म्हणतात, कधी गाडीतून आरोपी गेले म्हणतात. या प्रकरणात कुठलाही एक स्टॅण्ड नाही, असं यावेळी सोनवणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान  बालपणापासून सौरवने कधी रागाने सुध्दा बघीतलेलं नाही. रात्री फॉरेन्सिक टीम, एसआयटी टीम सगळे आलो होते.  माझ्या घरातील लग्न आहे,  पण आम्ही आज गेलो नाहीत. या प्रकरणाच्या मुळाशी गेलं पाहिजे. हे प्रकरण वेगळ्या वळणावर नेण्याचं काम केलंय.  माता भगिनींवर जर अन्याय करत असाल तर खासदार म्हणून मी सहन करणार नाही. सीआयडीकडून याचा तपास करा अशी माझी मागणी आहे, असं यावेळी खासदार सोनवणे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत