School Reopen : नाशिक मनपा हद्दीतील शाळा 13 डिसेंबरला सुरु होणार, औरंगाबादेतील शाळांबाबतचा निर्णय कधी?

| Updated on: Dec 09, 2021 | 6:56 PM

ओमिक्रॉन विषाणू आढळून आल्यानंतर परिस्थिती पाहून शाळा सुरु करण्याबाबत जिल्हा प्रशासनाचा कल आहे. या पार्श्वभूमीवर आता नाशिक महापालिका हद्दीतील शाळा 13 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतला आहे. तर औरंगाबाद शहरातील शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी उद्या बैठक बोलावण्यात आली आहे.

School Reopen : नाशिक मनपा हद्दीतील शाळा 13 डिसेंबरला सुरु होणार, औरंगाबादेतील शाळांबाबतचा निर्णय कधी?
school reopening
Follow us on

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Virus) काहीसा कमी झाल्याचं चित्र असताना राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मात्र, ओमिक्रॉन विषाणूच्या (Omicron Variant) प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जात आहे. ओमिक्रॉन विषाणू आढळून आल्यानंतर परिस्थिती पाहून शाळा सुरु करण्याबाबत जिल्हा प्रशासनाचा (District Administration) कल आहे. या पार्श्वभूमीवर आता नाशिक महापालिका हद्दीतील शाळा 13 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतला आहे. तर औरंगाबाद शहरातील शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी उद्या बैठक बोलावण्यात आली आहे.

नाशिकमधील शाळा 13 डिसेंबरपासून सुरु होणार

नाशिक महापालिका हद्दीतील शाळा 13 डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. इयत्ता पहिली ते सातवीचे वर्गही सुरु करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळा 10 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता.

औरंबादेतील शाळा कधी सुरु होणार?

औरंगाबाद शहरातील शाळा सुरु करण्याबाबत उद्या निर्णय घोणार आहे. औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. उद्या सकाळी 11 वाजता शाळा सुरु करण्यासंदर्भात बैठक होणार आहे. ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर 10 डिसेंबरला शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल असं आस्तिक कुमार पांडे म्हणाले होते. आता औरंगाबाद शहरातील कोरोना स्थिती सामान्य असल्यामुळे शाळा सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नांदेडमधील इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरु करण्याची मागणी

नांदेडमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी संस्थाचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. इंग्रजी माध्यमांच्या संस्थाचालकांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिलं आहे. मागील दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. तर शाळा चालकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं या संस्थाचालकांनी म्हटलंय.

इतर बातम्या :

जितेंद्र आव्हाडांकडून संजय राऊतांना नमन, ‘पवारांना खुर्ची देताना माणुसकीचं दर्शन’, भाजपवर शरसंधान

VIDEO: तो असंसदीय शब्द नाही, मी वापरलेला शब्द योग्यच, काय तक्रार करायची ती करा; राऊतांनी फटकारले