AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘वाहतुकीची सोय करा, कोरोना नियम पाळा,’ NAS सर्वेक्षणासाठी 12 नोव्हेंबरला शाळा सुरु ठेवण्याचे आदेश

संपादणूक सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर निवडण्यात आलेल्या शाळा उद्या म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी सुर ठेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोना प्रतिबंधक नियम पाळून राज्यात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू ठेवण्याचे शालेय शिक्षण विभागाला सांगण्यात आले आहे.

'वाहतुकीची सोय करा, कोरोना नियम पाळा,' NAS सर्वेक्षणासाठी 12 नोव्हेंबरला शाळा सुरु ठेवण्याचे आदेश
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 10:23 AM
Share

पुणे : केंद्र सरकारकडून देशभरात करण्यात येणाऱ्या संपादणूक सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर निवडण्यात आलेल्या शाळा उद्या म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी सुरु ठेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोना प्रतिबंधक नियम पाळून राज्यात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू ठेवण्याचे शालेय शिक्षण विभागाला सांगण्यात आले आहे.

निवड झालेल्या शाळा सुरु ठेवण्याचे आदेश

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त, प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक शिक्षण संचालकांची ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत 12 नोव्हेंबर रोजी करण्यात येणाऱ्या संपादणूक सर्वेक्षणावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत शिक्षण व साक्षरता विभागाच्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात महाराष्ट्र मागे राहता कामा नये यावर एकमत झाले. तसेच सर्वेक्षणासाठी निवडलेल्या तिसरी,पाचवी, आठवी आणि दहावीच्या शाळा 12 नोव्हेंबर रोजी सुरू ठेवण्यात याव्यात असे सांगण्यात आले.

वेळेत येण्यासाठी पर्यायी वाहतुकीची सोय करा

विशेष म्हणजे सध्या राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे बहुतांश भागात एसटीच्या फेऱ्या बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी  अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पर्यायी वाहतुकीची सोय करण्यात यावी, असे निर्देशदेखील वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) काय आहे ?

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात (NAS) प्रत्येक जिल्हयात काही निवडक शासकीय, खासगी अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित प्राथमिक व माध्यमिक शाळा निवडण्यात आल्या आहेत. या शाळांमधील इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी व दहावीतील विद्यार्थ्यांचे गणित, भाषा, विज्ञान, परीसर अभ्यास, समाजशास्त्र या विषयात दोन तासांची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांनी वरील इयत्तांमधील विद्यार्थी व शिक्षकांना 12 नोव्हेंबर रोजी चाचणीसाठी उपस्थित राहण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांना लोकल प्रवास करण्याची परवानगी 

या सर्वेक्षणासाठी बृहन्मुंबई, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातील शाळेत येण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना लोकलचा प्रवास करावा लागणार आहे त्यांना 12 नोव्हेंबर रोजी लोकल प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Maharashtra MLC Election 2021 : कोल्हापुरात सतेज पाटलांविरोधात कोण ? भाजपची महत्त्वाची बैठक, महाडिक म्हणतात संधी दिल्यास ताकदीने लढू

Happy Birthday Boney Kapoor | कठीण काळात साथ देत बोनी कपूरने जिंकले श्रीदेवींचे मन, ‘अशी’ सुरु झाली होती लव्हस्टोरी…

आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय, गोळ्या झाडून काटा काढला, हादरवून टाकणारा खून

(Varsha Gaikwad and state education department ordered to keep schools open for NAS survey)

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ