मोठी बातमी! विधान परिषद मतदानाच्या एक दिवस आधीच गेम फिरला, दोन कट्टर विरोधक एकत्र, गुप्त बैठकीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 23 ऑक्टोबर रोजी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. परंतु आता त्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! विधान परिषद मतदानाच्या एक दिवस आधीच गेम फिरला, दोन कट्टर विरोधक एकत्र, गुप्त बैठकीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Legislative Council Election
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 22, 2026 | 3:07 PM

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये अमरावती शिक्षक मतदारसंघ, पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ, नागपूर पदवीधर मतदारसंघ आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघ  या पाच जागांचा समावेश आहे. 23 ऑक्टेबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र त्यापूर्वीच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मतदानाच्या एक दिवस आधीच दोन राजकीय कट्टर विरोधक एकत्र आले आहेत. त्यांच्यामध्ये गुप्त बैठक देखील झाली आहे. या बातमीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

आमदार बच्चू कडू आणि रवी राणा हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. मात्र आता बच्चू कडू आणि रवी राणा एकत्र आल्याचं पहायला मिळत आहे. अमरावतीच्या एका महाविद्यालयात बच्चू कडू आणि रवी राणांची गुप्त बैठक पार पडली आहे.  महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या विजयाकरिता ही बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे.  या बैठकीमुळे आता अमरावती शिक्षक मतदारसंघात राजकीय समीकरण बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.  हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का ठरण्याची शक्यता आहे.

Loading...

महायुतीमध्ये अमरावती शिक्षक मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेला आहे. या मतदारसंघामधून शिवसेना शिंदे गटाने विद्यमान आमदार किरण सरनाईक यांनाच उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे या एकाच मतदारसंघात महाविकास आघाडीचे दोन उमेदवार निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसच्या वतीने आदिती पोहेरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाकडून दत्तात्रय लहाने हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकीकडे या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे  दोन उमेदवार रिंगणात आहेत, त्यामुळे आधीच याचा मविआला फटका बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे आता राजकारणात कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाणारे आमदार बच्चू कडू आणि रवी राणा  हे एकत्र आले आहेत.  अमरावतीच्या एका महाविद्यालयात त्यांची गुप्त बैठक पार पडली आहे, महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या विजयाकरिता ही बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us