AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लफडेबाजांनो… तू सुंदर दिसतेस असा मेसेज पाठवू नका, नाही तर विनयभंग मानला जाईल; कोर्टाचा ‘सुप्रीम’ निर्णय वाचला का?

दिंडोशी सत्र न्यायालयाने आरोपीने महिलेला सडपातळ, हुशार आणि सुंदर असल्याचे संदेश पाठवले होते, ज्यामुळे महिलेची प्रतिष्ठा भंग पावली. न्यायालयाने स्पष्ट केले की, असे संदेश विनयभंग आहेत आणि कोणतीही महिला अशा प्रकारचे वर्तन सहन करणार नाही.

लफडेबाजांनो... तू सुंदर दिसतेस असा मेसेज पाठवू नका, नाही तर विनयभंग मानला जाईल; कोर्टाचा 'सुप्रीम' निर्णय वाचला का?
| Updated on: Feb 21, 2025 | 5:43 PM
Share

सध्या आपण २१ व्या शतकात जगत आहोत. या शतकात तंत्रज्ञान प्रचंड प्रगत झाले आहे. पूर्वी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संदेश देण्यासाठी पत्रव्यवहार केला जायचा. मात्र आता आपण एका क्लिकवर एखाद्याला सहज मेसेज करता येतो. विशेष त्या व्यक्तीचाही आपल्याला पुढच्या मिनिटाला रिप्लाय येतो. मात्र आता तुम्हाला मेसेज करताना सावधानता बाळगावी लागणार आहे. जर तुम्ही एखाद्या अनोळखी महिलेला तू मला आवडतेस, असा मेसेज केला, तर तुम्हाला कोर्टाकडून थेट शिक्षा होऊ शकते. नुकतंच महाराष्ट्रातील दिंडोशीमध्ये एका घटनेप्रकरणी कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. अनोळखी महिलेला तू खूप सुंदर दिसतेस असा मेसेज पाठवणे म्हणजे विनयभंगच, असे निर्देश दिंडोशी सत्र न्यायालयाने दिले आहे.

नेमकं प्रकरण काय?

कोर्टाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेला एक पुरुष सतत व्हॉट्सअॅप मेसेज करायचा. रात्री ११ ते १२.३० दरम्यान तो विविध फोटो आणि मेसेज करत असायचा. “तू सडपातळ आहे, खूप हुशार आहेस, दिसायलाही गोरी आहे. मी ४० वर्षांचा आहे, तुझे लग्न झालं आहे का?” असे मेसेज तो व्यक्ती सतत त्या महिलेला करायचा. “अनेकदा त्याने मला तू आवडतेस”, असेही मेसेज केले आहेत. याप्रकरणी त्या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता.

याप्रकरणी कोर्टाने २०२२ रोजी आरोपीला दोषी ठरवले होते. त्याला तीन महिने जेलमध्ये राहण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. यानंतर त्याने दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेतली. आज दिंडोशी सत्र न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी करण्यात आली.

यावेळी त्या आरोपीने कोर्टात बाजू मांडली. राजकीय वैमनस्यामुळे मला या प्रकरणात अडकवलं जात आहे, असे आरोपीने म्हटले. मात्र, न्यायालयाने आरोपीचा युक्तीवाद फेटाळून लावत तुझ्याकडे असलेला एकही पुरावा सिद्ध होत नाही, असे सांगितले.

कोर्टाने काय म्हटलं?

यावेळी दिंडोशी सत्र न्यायालयाने त्यांचे निरीक्षण नोंदवले. “कोणतीही महिला अशाप्रकारे आरोपीला खोट्या प्रकरणात अडकवून स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावणार नाही. अनोळखी महिलेला तू सडपातळ आहे, खूप हुशार आहेस, दिसायलाही गोरी आहेस, मला तू आवडतेस, असे मेसेज करणे म्हणजे विनयभंगच आहे. हे मेसेज महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवतात. कोणताही विवाहित पुरुष किंवा महिला अशा प्रकारचे व्हॉट्सॲप मेसेज आणि अश्लील फोटो सहन करणार नाही. विशेषतः जेव्हा मेसेज पाठवणारा आणि तक्रारदार एकमेकांना ओळखत नाहीत. हे मेसेज आणि कृत्य महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आहे”, अशा शब्दात याप्रकरणी कोर्टाने फटकारलं आहे.

भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप.
भाजपची तुलना... शनिशिंगगणापूरमधल्या दरवाज्यांशी, मुनगंटीवारांची टीका
भाजपची तुलना... शनिशिंगगणापूरमधल्या दरवाज्यांशी, मुनगंटीवारांची टीका.
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.