भाजी कापण्याच्या सुरीने आईवरच पोटच्या मुलाचे सपासप वार, धक्कादायक घटनेने महाड हादरले…

पोटच्या मुलानेच आईवर भाजी कापण्याच्या चाकूने सपासप वार केल्याची घटना घडल्याने महाड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

भाजी कापण्याच्या सुरीने आईवरच पोटच्या मुलाचे सपासप वार, धक्कादायक घटनेने महाड हादरले...
crime scene
| Updated on: Sep 05, 2026 | 6:59 AM

पोटच्या मुलानेच आईवर सुरीने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आईशी झालेल्या वादानंतर रागाने संतापलेल्या मुलाने आईवर भाजी कापण्याच्या सुरीने वार केल्यानंतर या मुलाने स्वत: वरही वार करुन स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

मुलानेच आईशी किरकोळ वादातून तिच्यावर भाजी कापण्याच्या सुरीने हल्ला केल्याची घटना महाड तालुक्यातील रुपवली सुंभेकोंड येथे घडली आहे. या घटनेनंतर मुलाने देखील स्वत:वर वार केल्याची घटना घडली आहे.

Loading...

तळहाताच्या फोडाप्रमाणे ज्याला जपला, नऊ महिने आपल्या पोटात वाढवले, न्हाऊ माखू घातले त्या मुलानेच जन्मदात्या आईच्या पोटावर भाजी कापण्याच्या सुरीने सपासप वार केल्याच्या धक्कादायक घटना महाड तालुक्यातील रुपवली सुंभेकोंड गावात घडली. किरकोळ वादाचे पर्यावसन रक्तरंजित घटनेत घडल्यानंतर घाबरलेल्या या मुलाने नंतर स्वत:वरही वार करुन जीवनसंपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्याला यश आले नाही. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अशा प्रकारे किरकोळ कारणावरुन क्षणिक संतापात आई-वडिलांवरच मुलाने हल्ला करण्याच्या घटनांत वाढ झाली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us