AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saif Ali Khan Attack Case: मध्यरात्री घरात घुसला, जेहच्या खोलीकडे गेला अन् मागितले 1 कोटी; नर्सने सांगितलं काय घडलं!

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात सैफ अली खानच्या घरी एक अज्ञात हल्लेखोर घुसला होता. यावेळी झालेल्या हल्ल्यात सैफ जखमी झाला होता. आता याप्रकरणाची सुनावणी सुरू झाली असून त्या रात्री नेमकं काय घडलं ते नर्सने सांगितलं आहे.

Saif Ali Khan Attack Case: मध्यरात्री घरात घुसला, जेहच्या खोलीकडे गेला अन् मागितले 1 कोटी; नर्सने सांगितलं काय घडलं!
| Updated on: Oct 24, 2026 | 6:10 PM
Share

अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्या मुंबईतील निवासस्थानी झालेल्या हल्ल्याबद्दल सर्वांनाच माहीत आहे. आता याप्रकरणी कोर्टात सुनावणीला सुरूवात झाली आहे. कुटुंबाच्या नर्सने याप्रकरणी कोर्टात आरोपी मोहम्मद शरीफुलची ओळख पटवली आहे. त्या दिवशी नेमकं काय झालं हेही नर्सने सांगितलं आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी 2025 मध्ये चोरीच्या प्रयत्नात हाच आरोपी घरात घुसला होती. 59 वर्षांची ही नर्स या प्रकरणातील तक्रारदार आणि पहिली साक्षीदार आहे. ती पाच वर्षांपेक्षा जास्त काळ सैफ अली खान आणि करीना कपूरच्या कुटुंबासोबत काम करत असल्याचं तिने कोर्टात सांगितलं.

सैफ-करीनाचा धाकटा मुलगा जेह याची काळजी घेणं ही तिची जबाबदारी होती. 15-16 जानेवारीच्या रात्री घरात नेमकं काय झालं ते आता या नर्सने कोर्टात सांगितलं. आरोपीने घरात घुसून जेहच्या खोलीत जाण्याचा प्रयत्न केला होता तसेच 1 कोटी रुपयांची मागणी देखील केली होती, असं तिने कोर्टात सांगितल्याची माहिती समोर आली आगे.

आरोपीने मागितले 1 कोटी

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, रात्री उशिरा एक व्यक्ती घरात घुसली आणि त्याने सैफ अली खान याच्यासह अनेकांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. पोलिसांना सुरुवातीला दिलेल्या जबाबानुसार, रात्री सुमारे दोन वाजता घरातील नर्सला आवाज आल्याने जाग आली. त्यानंतर तिला बाथरूमचा दिवा सुरू असल्याचं दिसलं सुरुवातीला बाथरूममध्ये करीना कपूर असेल, असा तिचा समज झाला. मात्र, काही वेळाने तिला काहीतरी संशयास्पद घडत असल्याची जाणीव झाली. नर्सने दिलेल्या माहितीनुसार, तिला टोपी घातलेल्या एका अनोळखी व्यक्तीची सावली दिसली. ही व्यक्ती जेहच्या पलंगाच्या दिशेने जात होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच नर्सने तातडीने जेहला उठवण्यासाठी धाव घेतली. मात्र, याच वेळी संबंधित व्यक्तीने तिच्यावर हल्ला केला.

नर्सच्या जबाबानुसार, जेहला उठवण्यासाठी जात असताना आरोपीने तिच्यावर हेक्सा ब्लेडने हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या दोन बोटांना दुखापत झाली. एवढंच नव्हे, तर आरोपीने तिला गप्प राहण्याची आणि खोलीबाहेर न जाण्याची धमकी दिली, असाही आरोप आहे. तुला नक्की काय हवयं,असं त्या नर्सने हल्लेखोराला विचारलं असता, त्याने पैशांची मागणी केली. त्याने तब्बल एक कोटी रुपयांची मागितल्याचं, नर्सने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितल्याचं वृत्त आहे. दरम्यान, खोलीत सुरू असलेल्या गोंधळामुळे जेहची नॅनी देखील जागी झाली. त्या वेळी ती खोलीतच उपस्थित होती. या घटनेमुळे घरातील वातावरण तणावपूर्ण झालं होतं.

हल्लेखोराला रोखण्यासाठी सैफ अली खानने केला सामना

नर्सच्या जबाबानुसार, घरात सुरू असलेला गोंधळ लक्षात आल्यानंतर सैफ अली खान याने हल्लेखोराचा सामना केला. तू कोण आहेस आणि काय हवं आहे, अशी सैफनेत्या व्यक्तीकडे विचारणा केली. मात्र, याच वेळी आरोपीने सैफ याच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. आवाज ऐकून घरातील आणखी एक कर्मचारी खोलीत पोहोचला. मात्र त्याच्यावरही हल्ला करण्यात आल्याचे नर्सने सांगितले. त्यानंतर सैफ हा काही काळ हल्लेखोराला रोखण्यात यशस्वी झाला. मात्र, परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात आल्याने कुटुंबीय आणि कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या खोलीत जाऊन स्वतःला आतून बंद करून घेतले.

घरातील इतर कर्मचाऱ्यांनाही गोंधळाचा आवाज ऐकू आला आणि ते घटनास्थळी पोहोचले. या घटनेत सैफ अली खान याच्या पाठीत, मानेवर आणि हातावर दुखापती झाल्या. त्यानंतर त्याला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं .

Follow Us
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...