AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असेही वदवून घ्याल… बाळासाहेब ठाकरेंच्या AI भाषणावरुन शहाजीबापूंचा संताप

नाशिकमधील शिवसेना (ठाकरे गट)च्या मेळाव्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) साह्याने बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण सादर करण्यात आले. यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी यावरून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असेही वदवून घ्याल... बाळासाहेब ठाकरेंच्या AI भाषणावरुन शहाजीबापूंचा संताप
shahajibapu patil
| Updated on: Apr 18, 2025 | 5:09 PM
Share

नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या निर्धार मेळाव्यात AI तंत्रज्ञानाचा वापर करून स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण दाखवण्यात आले. “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…” हे बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातील शब्द कानावर पडताच शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला. मात्र या AI तंत्रज्ञानाच्या वापरावरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. आता यावरुन सांगोलाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

ठाकरे गटाच्या मेळाव्यात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या AI तंत्रज्ञानातील भाषणावर सत्ताधाऱ्यांनी टीका केली आहे. आता यावर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा शिवसेनेचा पोरखेळ सुरु, असा घणाघात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला.

AI तंत्रज्ञानाने बाळासाहेब ठाकरेंचा आवाज काढून उद्धव ठाकरेंनी त्यांच्या विचारांची तोडफोड केली आहे. उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार आणि सोनिया गांधी देवमाणूस आहेत, असेही तुम्ही वदवून घ्याल. शिवसेनेचा हा पोरखेळ सुरू आहे, असे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी म्हटले.

बाळासाहेब ठाकरेंचा आवाज निर्माण करणे योग्य नाही

दुष्काळी सांगोला, माळशिरस आणि पंढरपूर तालुक्याला नीरा देवधरचे पाणी मिळण्यास महाविकास आघाडीचे संजीवराजे निंबाळकर यांनी विरोध केल्याने शहाजीबापू पाटील यांनी त्यांचा निषेध व्यक्त केला. संजय राऊत रात्री विचार करून सकाळी राजकीय कळ लावतात. उद्या सोनिया गांधी या देशाच्या महान नेत्या होत्या, असेही बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजात काढून घेण्याचे काम संजय राऊत करू शकतात. त्यामुळे AI तंत्रज्ञानाने बाळासाहेब ठाकरेंचा आवाज निर्माण करणे योग्य नाही,” असे शहाजीबापू पाटील म्हणाले.

युती करुनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार

“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांमध्ये राज्यात भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी युती करूनच लढतील”, असा विश्वासही शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Follow Us
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये...
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...