शालेय पोषण आहार ठरला विद्यार्थ्यांसाठी बाधक, ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा

जितेंद्र झंवर, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 27, 2023 | 5:20 PM

सांगलीत सुमारे 32 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्व विद्यार्थ्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

शालेय पोषण आहार ठरला विद्यार्थ्यांसाठी बाधक, ३२ विद्यार्थ्यांना विषबाधा
शालेय पोषण आहार (फाईल फोटो)
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क

सांगली : विद्यार्थ्यांना शाळेत दिला जाणारा पोषण आहारच त्यांच्यांसाठी बाधक ठरला आहे. सांगली शहरातल्या एका शाळेमधील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे प्रकार घडला आहे. सुमारे 32 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्व विद्यार्थ्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

विजयनगर इथल्या वानलेसवाडी हायस्कूल येथील पाचवी ते सातवीतील देण्यात आलेल्या पोषण आहार मधून विषबाधा झाल्याचा समोर आला आहे. मळमळ, उलटी आणि जुलाब हा प्रकार सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी तातडीने या मुलांना स्थानिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टरांना बोलून दाखवलं. मात्र, त्यानंतर अधिक त्रास होणाऱ्या 32 विद्यार्थ्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्याच्या परिस्थितीमध्ये या सर्वांची प्रकृती स्थिर आणि उत्तम असल्याचा माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितलं आहे. घटनेची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये धाव घेतली होती. यातील काही विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देखील करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI