जरांगेंची शिंदेंवर एकेरी भाषा, शिवसेनेचे मंत्री देसाई भडकले, थेट म्हटले, आम्ही..
एकनाथ शिंदे यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून टीका केली जात आहे. यादरम्यानच शिंदेंच्या मंत्र्यांकडून मोठे भाष्य करण्यात आले. त्यांनी थेट जरांगे यांना आवाहन केले. यासोबतच अगोदरची भाषा बदलल्याचेही त्यांनी म्हटले.

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आंदोलन केले जात आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जरांगे यांनी टीका केली. त्यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला. फडणवीस आणि शिंदे मिळून गेम करत असल्याचे त्यांनी म्हटले. मागच्या आंदोलनात शिंदे यांच्यावर टीका करताना कधी जरांगे दिसले नाहीत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शिंदे यांच्यावर टीका केली जात आहे. हेच नाही तर जरांगे यांच्याकडून वारंवार शिंदे यांचा एकेरी भाषेत उल्लेखही केला जात आहे. जरांगे यांच्याकडून शिंदेचा एकेरी भाषेत होणाऱ्या उल्लेखावर आता मंत्री शंभूराज देसाई चांगलेच भडकले आहेत. देसाई यांनी म्हटले की, मी गेलेलो भेटायला. हैदराबाद गॅझेटसाठी प्रयत्न केला. त्यानंतर साडेतीन ते चार लोकांनी प्रमाणपत्र घेतले.
जे जे शब्द दिले ते पुर्ण केले. जरांगेंनी एकेरी शब्द वापरला ते कोणालाही रुचले नाही. अनेक मराठा समाजाच्या मुलांचे फोन आले. हे योग्य नाही. आम्ही त्यांना दादा म्हणतो. जे धोरण आंदोलन सुरु झालं, त्याची दिशा दुसरीकडे चालले असं सामान्यांना वाटत. शिंदे फडणवीस यांनी दिलेले शब्द पुर्ण करत आहोत. पुर्ततासाठी आम्ही आढावा बैठका घेतल्या.
शिंदेंवरची टीका मराठा समाजाला रुचली नाही. टीका करु नये आवाहन आहे. पुढे देसाई यांनी म्हटले की, चर्चेला सरकार तयार आहे. आम्ही ओपन आहोत. अशा टिकेमुळे राजकीय वळण लागत आहे. आम्ही त्यांना मानसन्मान देतो. पुढे एकनाथ शिंदेंवर टीका न करण्याचे आवाहन त्यांनी केले. मुद्देनिहाय आम्ही काय कारवाई केली आम्ही त्यांना लेखी दिले आहे.
त्यांना चर्चा करायची असेल तर त्यानी याव त्यांच्या मंडळाला पाठवाव, सरकार चर्चेला तयार. आधीचे जरांगे यांचे बोलणे. त्यांचं वक्तव्य होत शिंदेंनी मराठ्यांच भलं केलं. आता एकाएकी काय झालं. सरकारची भुमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाचे शिंदे नेतृत्व करतात. त्यांच्यावर टीका सामान्यांनी आम्हाला फोन केले, असेही शंभूराज देसाई यांनी म्हटले.