AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जूही चावलाचं बोल्ड आणि कॉमेडी गाणं, जे अनेक महिला लपून-लपून ऐकतात, आजही डिजेची आहे शान

जूही चावलाचं बोल्ड आणि कॉमेडी गाणं, जे इला अरुण-अलका याग्निक यांच्या जुगलबंदीमुळे ठरलं प्रचंड लोकप्रिय. आजही अनेक डिजेवर ऐकू येतं. अनेक महिला लपून लपून ऐकतात गाणं.

जूही चावलाचं बोल्ड आणि कॉमेडी गाणं, जे अनेक महिला लपून-लपून ऐकतात, आजही डिजेची आहे शान
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 09, 2026 | 1:41 PM
Share

90 च्या दशकातील बॉलिवूड संगीताची एक वेगळीच क्रेझ होती. रोमँटिक आणि भावूक गाण्यांसोबतच या काळात काही भन्नाट, मिश्कील आणि हटके गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली. अशीच काही मजेशीर गाणी आजही लग्नसमारंभातील डीजेवर वाजली की वातावरणात हशा आणि धमाल निर्माण होते. हे गाणं म्हणजे 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नाजायज’ चित्रपटातील ‘दरवाजा खुला छोड़ आई नींद के मारे’.

या गाण्यात अलका याज्ञिक यांच्या सुरेल आवाजासोबत लोकगायिका इला अरुण यांच्या खास देशी अंदाजाची भन्नाट जुगलबंदी पाहायला मिळते. गाण्याचे बोल पुष्पा वर्मा आणि माया गोविंद यांनी लिहिले असून, त्यातील मिश्कील आणि खट्याळ शब्दांमुळे हे गाणं त्या काळात विशेष चर्चेत आलं होतं. गाण्यातील विनोदी प्रसंग आणि देशी तडका यामुळे 90 च्या दशकाची झलक आजही जाणवते.

झोपेत केलेल्या गमती-जमतींवर आधारित गाणं

‘दरवाजा खुला छोड़ आई नींद के मारे’ या गाण्यात एका महिलेच्या झोपेच्या नशेत होणाऱ्या मजेदार चुका विनोदी पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. पती रात्री पाणी मागतो, मात्र झोपेत असल्यामुळे ती त्याचा वेगळाच अर्थ घेते. दैनंदिन आयुष्यातील खाण्या-पिण्यापासून इतर छोट्या-छोट्या गोष्टींपर्यंत तिच्याकडून होणाऱ्या गमतीशीर चुका गाण्यात रंगवल्या आहेत.

या सगळ्या प्रसंगांना ‘नींद के मारे’ हा धागा जोडतो. अतिशयोक्ती, देशी विनोद आणि खट्याळ शब्दांचा वापर केल्यामुळे हे गाणं इतर गाण्यांपेक्षा पूर्णपणे वेगळं ठरतं. त्यामुळे आजही लग्नाच्या पार्ट्यांमध्ये हे गाणं वाजलं की जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.

‘नाजायज’चा संगीत अल्बमही गाजला

महेश भट्ट दिग्दर्शित ‘नाजायज’ हा 1995 मध्ये प्रदर्शित झालेला क्राइम-ड्रामा चित्रपट होता. अजय देवगण, नसीरुद्दीन शाह, जुही चावला, दीपक तिजोरी आणि गुलशन ग्रोव्हर यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात होत्या. चित्रपटाच्या कथेत गुन्हेगारी जगत, पोलिस अधिकारी आणि कौटुंबिक नात्यांमधील गुंतागुंत यांचं चित्रण करण्यात आलं होतं.

या चित्रपटाच्या संगीत अल्बममध्ये ‘बरसात के मौसम में’, ‘लाल लाल होंठों पे’ आणि ‘क्या तुम मुझसे प्यार करते हो’ यांसारखी गाणीही होती. मात्र या सगळ्यांमध्ये ‘दरवाजा खुला छोड़ आई नींद के मारे’ या हटके गाण्याची रंगतच वेगळी होती.

Follow Us
भाजपची साथ सोडली तर राष्ट्रवादीसोबत विलीनीकरण...रोहित पवार काय म्हणाले
भाजपची साथ सोडली तर राष्ट्रवादीसोबत विलीनीकरण... रोहित पवार असं काय म्हणाले?
नागोठणेचा उड्डाणपूल पुन्हा चर्चेत! सिमेंटच्या प्लेट्सना काचेचा आधार अन
Nagothane Bridge Issue | नागोठणेचा उड्डाणपूल पुन्हा चर्चेत! सिमेंटच्या प्लेट्सना काचेचा आधार अन्...; व्हिडिओ व्हायरल
अकोल्यात 40-45 दिवसांपासून पाऊस नाही; शेतकरी हवालदिल
Akola | अकोल्यात 40-45 दिवसांपासून पाऊस नाही; सोयाबीन पीक उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल
सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले...
Solapur | सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले; नेमक्या मागण्या काय?
धक्कादायक! थलपती विजयचं फेक अकाऊंट चक्क... जळगाव कनेक्शन समोर, नेमकं..
धक्कादायक! थलपती विजयचं फेक अकाऊंट चक्क... जळगाव कनेक्शन समोर, नेमकं काय घडलं?
पावसाने दिली दडी अन् शेतकरी संकटात! विदर्भातील जवळपास 20 तालुक्यांत...
Farmers Issue | पावसाने दिली दडी अन् शेतकरी संकटात! विदर्भातील जवळपास 20 तालुक्यांत 20-22 दिवसांपासून पाऊसच नाही
राज ठाकरेंवर अश्लील वक्तव्य करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेचा दणका!
MNS | राज ठाकरेंवर अश्लील वक्तव्य करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेचा दणका! नेमकं कारण काय?
धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक...
Sanjay Raut | धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक; चिन्ह गोठवण्याची केली मागणी
तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ असाल, माझ्या नादाला लागायचं नाही! मनोज जरांगे..
Manoj Jarange Patil Andolan | तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ असाल, माझ्या नादाला लागायचं नाही! मनोज जरांगे पाटलांचा भरत गोगावले यांना थेट इशारा
गणेश आगमनाआधीच विघ्न! धारावीत स्पीड ब्रेकरवर ट्रॉलीचा तोल गेला अन्...
Ganpati Idol Collapsed | गणेश आगमनाआधीच विघ्न! धारावीत स्पीड ब्रेकरवर ट्रॉलीचा तोल गेला अन्, पुढे जे झालं...