Shambhuraj Desai: दमाची भाषा आम्ही कधी केली नाही, पण…; जयकुमार गोरेंच्या जालीम औषधावर शंभूराज देसाईंचा पलटवार, काय म्हणाले?

Shambhuraj Desai Targets Jaykumar Gore: मंत्री जयकुमार गोरेंवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी निशाणा साधला आहेत. तसेच त्यांना एक टोला लगावला आहे. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.

Shambhuraj Desai: दमाची भाषा आम्ही कधी केली नाही, पण...; जयकुमार गोरेंच्या जालीम औषधावर शंभूराज देसाईंचा पलटवार, काय म्हणाले?
Shambhuraj Desai's 'Aghori Baba' Jibe Targets Jaykumar Gore
| Updated on: Nov 21, 2026 | 8:21 PM

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून मंत्र्यांमध्ये शाब्दिक युद्ध झाल्याचे दिसून आले आहे. ​सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या ‘जालीम औषधाच्या’ वक्तव्यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे गोरे यांनाच विचारावे लागेल आणि त्यांना त्याचा इलाज लागू पडला असेल तर मी त्यांच्याकडून माहिती घेईन,” असा मिश्कील टोला शंभुराज देसाई यांनी लगावला.

मंत्री जयकुमार गोरे यांनी ‘दम होता तर निवडणूक लढवायची या केलेल्या विधानावर मंत्री शंभूराज देसाई यांनी आम्ही कधीही दमाची भाषा केली नाही, परंतु कोणी वारंवार तसे बोलत असेल तर आकडेवारी सर्व काही स्पष्ट करते आणि यावर जाहीर चर्चा करण्याची आपली तयारी आहे. तालुक्याच्या ११ पैकी ७ जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीने जिंकल्या आहेत. जिल्हा गटातील ५ जागांवरही हेच ठरावधारक मतदान करणार असल्याने आमची बाजू भक्कम असल्याचा दावा देसाई यांनी केला.

Loading...

महायुतीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडून आल्याबद्दल सर्वच पक्ष आनंदित आहेत. जयकुमार गोरे हे मंत्रिमंडळातील सहकारी असल्याने स्वबळावरील निवडणुकीबाबत त्यांच्यावर अधिक भाष्य करणार नसल्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले. शंभूराज देसाई म्हणाले की, ​महायुतीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडून आल्याबद्दल महायुतीतील सर्वच पक्ष आनंदित आहेत. राजकीय विषयावर न बोलण्याचे ठरवले होते. मात्र पत्रकारांनी वारंवार प्रश्न विचारल्यामुळे मौन बाळगणे योग्य ठरणार नाही. कारण उघडपणे बोलण्याची आपली सवय आहे.

ते म्हणाले की, ​आकडेवारीच्या बेरजेत पडण्याची इच्छा नसतानाही कोणी जाणीवपूर्वक ‘दमाची’ भाषा करत असेल, तर या विषयावर जाहीर चर्चा करण्याची आपली तयारी आहे. स्वबळावर निवडणूक झाली असती तर काय झाले असते या प्रश्नावर, जयकुमार गोरे आमच्या मंत्रिमंडळातील सहकारी आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल मी असे काही बोलणार नाही, असं शंभूराज देसाई म्हणाले. यानंतर आता राजकारण पुन्हा ढवळून निघालं आहे. राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us