मोठी बातमी! शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत मोठी अपडेट
मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना आता पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना आता पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी पुण्यातील रूबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना रूबी रुग्णालयातून डिसचार्ज मिळाला होता. दरम्यान त्यानंतर त्यांना आता ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना कफचा त्रास होत होता, त्यामुळे त्यांना पुण्यातील रूबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिसचार्ज मिळाला होता. मात्र त्यांना आता मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली आहे. शरद पवार यांना तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे यांनी हॉटस्अप स्टेटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. शरद पवार यांना पुढील तपासणीसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना अचानक कफाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुण्यातील रूबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यानंतर त्यांना आता ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
शरद पवारांना पंतप्रधान मोदींचा फोन
दरम्यान शरद पवार यांना कफाचा त्रास जाणवत असल्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिसचार्ज देण्यात आला. शरद पवार यांनी डीसचार्ज मिळताच त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केला. मोदी यांनी शरद पवार यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. तसेच त्यांना आता विश्रांती घ्या, तब्येतीची काळजी घ्या, असंही यावेळी मोदी यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा शरद पवार यांना पुढील तपासणीसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.