आता होळकरांच्या वंशजांचीही शरद पवारांवर टीका, छत्रपती संभाजीराजेंनाही पाठवला संदेश

| Updated on: Feb 12, 2021 | 5:59 PM

छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीही या सोहळ्याला उपस्थित राहू नये, असा संदेश भूषण राजे होळकर यांनी दिला आहे. | ahilyabai holkar

आता होळकरांच्या वंशजांचीही शरद पवारांवर टीका, छत्रपती संभाजीराजेंनाही पाठवला संदेश
sharad-pawar
Follow us on

कराड: भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यानंतर आता होळकर घराण्याच्या वंशजांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. शरद पवार या सगळ्याच्या माध्यमातून राजकारण करु पाहत असल्याचा आरोप भूषण राजे होळकर यांनी केला. (Ahilyabai holkar jejuri fort statue inauguration)

जेजुरी गडावरील राजमाता अहिल्या देवी यांच्या पुतळ्याचे शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होणार होते. मात्र, अहिल्यादेवींच्या पुतळ्याला शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्टाचारी नेत्याचे हात लागता कामा नये, असे सांगत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी आजच जेजुरी गडावर जाऊन या पुतळ्याचे अनावरण केले. त्यामुळे यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता होळकर घराण्याचे वंशज असलेल्या भूषण राजे होळकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले. तसेच छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीही या सोहळ्याला उपस्थित राहू नये, असा संदेश भूषण राजे होळकर यांनी दिला आहे. जेजुरी गडावरील राजमाता अहिल्या देवी यांच्या पुतळ्यांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातून शरद पवार यांच्याकडून राजकारण होत आहे. छत्रपती घराणे सर्व समाजाचे भल्याचा विचार करणारे असल्याने छत्रपती संभाजी राजेंना या कार्यक्रमाला न जाण्याची विनंती केल्याचे भूषण राजे होळकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना सांगितले.

अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचं अनावरण भोवलं, गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल

जेजुरीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं परस्पर अनावरण करणं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना चांगलं महागात पडलंय. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात गोपीचंद पडळकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय. तसेच पोलीस कामात अडथळा आणण्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

संबंधित बातम्या:

महाविकास आघाडी सरकार धनगरांचा तिरस्कार करतंय, पडळकरांचा गंभीर आरोप

अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचं अनावरण भोवलं, गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल

(Ahilyabai holkar jejuri fort statue inauguration)