Amol Kolhe : महात्मा फुलेंचा इतिहास पहिली शाळा सुरु झाली, त्यापुढं का सांगितला जात नाही यामागे कोणतं षडयंत्र ? अमोल कोल्हेंचा सवाल

Amol Kolhe : "संसदेत मी महात्मा फुलेंची पगडी घालून आणि शेतकऱ्यांचा आसूड हा पुस्तक घेऊन गेलो, तेव्हा महाराष्ट्रातील सहा खासदारांनी मला एक प्रश्न विचारला, पगडी कोणती घातली? त्या सहा खासदारांची मी नावं सांगणार नाही"

Amol Kolhe : महात्मा फुलेंचा इतिहास पहिली शाळा सुरु झाली, त्यापुढं का सांगितला जात नाही यामागे कोणतं षडयंत्र ? अमोल कोल्हेंचा सवाल
Amol Kolhe
| Updated on: Nov 21, 2026 | 2:18 PM

“महात्मा फुले सांगणं सोप आहे ते आचरणात आणणं अवघड आहे. सावित्रीबाई सांगणं सोपं आहे. आचरणात आणायला अवघड आहे. महापुरुषाचे पुतळे उभे करणं सोपं आहे. मात्र त्ंयाचे विचार आचरणात आणणं अवघड आहे” असं खासदार अमोल कोल्हे म्हणाले. “महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री आज पर्यंत मिळाली नाही. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार अमलात आणायला सरकार कमी पडलं का?. सत्य शोधायला लागलो तर आम्हाला एक सोय करून द्यायला लागली. आमच्या प्रत्येक महापुरुषाला एक जातीची चौकट घातली गेली आणि त्याच्या गळ्यात एक धर्माचा हार घालण्यात आला आणि त्या महापुरुषाला त्या जातीच्या चौकटीत आणि धर्माच्या हारामध्ये अडकून ठेवण्यात आले. त्यांना व्यापक समाजाचा विचार करण्याची मुभा दिली गेली नाही” असं अमोल कोल्हे म्हणाले.

“संसदेत मी महात्मा फुलेंची पगडी घालून आणि शेतकऱ्यांचा आसूड हा पुस्तक घेऊन गेलो, तेव्हा महाराष्ट्रातील सहा खासदारांनी मला एक प्रश्न विचारला, पगडी कोणती घातली? त्या सहा खासदारांची मी नावं सांगणार नाही. सध्या फुलेंचा इतिहास हा पहिली शाळा सुरु झाली, तेवढाच इतिहास सांगितला जातो. पण त्यापुढं इतिहास सांगितला जात नाही, का? यामागे नेमकं कोणतं षडयंत्र आहे. हा इतिहास सोडून द्या, असं म्हणायचं आहे का?” असं अमोल कोल्हे म्हणाले.

Loading...

महाराष्ट्रात आजवर एकही महिला मुख्यमंत्री का होऊ शकली नाही

“फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात आजवर एकही महिला मुख्यमंत्री का होऊ शकली नाही” असा थेट आणि विचार करायला लावणारा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला. “फुले दाम्पत्याचे विचार केवळ भाषणांमधून मांडायचे की प्रत्यक्ष आचरणातही आणायचे” असा सवाल करत कोल्हेंनी आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखित केली.

महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री का मिळाली नाही?

सामाजिक सुधारणांचा आणि स्त्रीशिक्षणाचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकीय प्रवासावर खासदार अमोल कोल्हे यांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलाय. “फुले, शाहू, आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला आजवर एकही महिला मुख्यमंत्री का मिळाली नाही” असा थेट सवाल त्यांनी केला. “महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार भाषणातून सांगणं सोपं; मात्र ते प्रत्यक्ष आचरणात आणताना आपण कुठेतरी कमी पडलो का” असा आत्मपरीक्षण करायला लावणारा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री का मिळाली नाही, या त्यांच्या सवालामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झालीय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us