कोल्हापूर महानगरपालिकेत आजही पाळला जातो ‘हा’ नियम, अंत्यसंस्कार मोफत होतात, मराठमोळ्या अभिनेत्याचं मोठं विधान
कोल्हापूरमध्ये व्यक्तीचं निधन झाल्यानंतर एकही रुपया मोजावा लागत नाही. आजही कोल्हापूरची महानगरपालिका हा नियम पाळते... एका मुलाखतीत मराठमोळ्या अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे.

मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेते ऋषिकेश जोशी यांनी फक्त मराठीच नाही तर, हिंदी सिनेविश्वात देखील स्वतःची ओळख भक्कम केली आहे. मालिका, सिनेमे आणि नाटकांमध्ये देखील जोशी यांनी महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. तर ‘हरिशचंद्रची फॅक्ट्री’, ‘येलो’, ‘आजचा दिवस माझा’, ‘देऊळ’, ‘विष्णुपंत दामले: द अनसंग हीरो ऑफ टॉकीज’ यांसारख्या सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. दरम्यान, एका मुलाखतीत, जोशी यांनी कोल्हापूर बद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘जन्माला कोल्हापूरमध्ये नाही आलात तरी चालेल पण, मृत्यू कोल्हापुरातच झाला पाहिजे…’, असं ऋषिकेश जोशी म्हणाले.. तर जाणून घ्या अभिनेते असं का म्हणाले.
ऋषिकेश जोशी म्हणाले, ‘जगामध्ये कोल्हापूर असं एकमेव शहर आहे, जगाच कुठल्याही माणसानं कुठेही जन्माला यावं, त्यानं मरावं कोल्हापुरात. कारण कोल्हापूर महानगरपालिकेत, कोल्हापूरमध्ये तुमचा मृत्यू झाला असेल, तर अंत्यविधी तुमचा जेव्हा होतो, तेव्हा त्यासाठी एक रुपया देखील खर्च येत नाही. महाराजांनीच त्यावेळी एका गॅझेटमध्ये… म्हणजे बोलायचं झालं तर, त्यांनी बील पास केलं होतं आणि आता देखील महानगरपालिका सक्तीचं आहे की, गेलेल्या माणसाच्या क्रियाक्रमाचे पैसे घ्यायचे नाहीत.
ही फार मोठी गोष्ट आहे. ही गोष्ट फक्त विनोदापर्यंत मर्यादित नाही. दुरोगामी विचार आहेत तो, मग अंत्यविधीसाठी लाकडं वैगरे किती लागणार, हे सर्व पाहण्यासाठी शहर संपन्न आहे. लाकडं आणायची… स्मशानात पैसे नाही लागत… असं देखील अभिनेते ऋषिकेश जोशी म्हणाले. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका मुलाखतीत जोशी यांनी सांगितलं होतं.
सांगायचं झालं तर, कोल्हापूर शहरात कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्मशानभूमींद्वारे अंत्यसंस्काराची व्यवस्था केली जाते, ज्यामध्ये पंचगंगा स्मशानभूमीसह कसबा बावडा, कदमवाडी आणि बापट कॅम्प येथील स्मशानभूमींचा समावेश आहे. तर दररोज सुमारे 10 ते 15 मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात.. असं देखील सांगितलं जातं. मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारा सर्व खर्च कोल्हापूर महानगरपालिका करते.
