AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीएफबद्दल मोठी घोषणा, 90 टक्के रक्कम काढता येणार, 8 महत्वाचे नियम, थेट 3 दिवसात..

EPFO बोर्डाने PF खातेधारकांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. त्यातच खातेधारकांसाठी आनंदाची बातमी EPFO बोर्डाने दिली. पीएफ काढण्याचा प्रक्रिया आता सोपी करण्यात आली. सप्टेंबर 2014 पासून लागू असलेल्या EPS-95 योजनेअंतर्गत 1000 रुपयांच्या किमान मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याबाबत चर्चा सुरू आहे. 

पीएफबद्दल मोठी घोषणा, 90 टक्के रक्कम काढता येणार, 8 महत्वाचे नियम, थेट 3 दिवसात..
PF
| Updated on: Nov 21, 2026 | 2:09 PM
Share

EPFO बोर्डाने PF खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. अनेक मोठ्या घोषणा त्यांच्याकडून करण्यात आल्या. अनेक नियमात थेट बदल करण्यात आली. पीएफ खात्यातून अगोदर 25 टक्के ठेऊनच रक्कम काढता येत होती. मात्र, आता नवीन नियमानुसार पीएफ खात्यात फक्त 10 टक्के रक्कम ठेऊन उर्वरित रक्कम तुम्ही काढू शकता. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीच्या पीएफ खात्यात जर 1 लाख असतील तर तो व्यक्त 90 हजार रूपये काढू शकतो. पूर्वी असे नव्हेत. 25 टक्के रक्कम पीएफ खात्यात ठेवणे अर्निवार्य होते. यासोबतच EPFO बोर्डाने अनेक गोष्टींमध्ये मोठे बदल केले आहेत. काही प्रकारच्या अंशतः पैसे काढण्यासाठी आवश्यक असलेला किमान वर्गणी कालावधी 12 महिन्यांवरून कमी करून थेट 2 महिने करण्यात आला आहे. अचानक नोकरी गेल्यानंतर कर्मचारी 2 महिन्यातच पीएफ खात्यातून सर्व पैसे काढू शकतो.

पीएफ खातेधारक लग्न, वैद्यकीय उपचार, मुलांचे शिक्षण आणि घराशी संबंधित गरजा यासारख्या कारणांसाठी रक्कम काढू शकतात. बरेच लोक रिटायरनंतर या पैशांचा उपयोग होईल म्हणून या पैशांना अजिबात हात लावत नाहीत. शिवाय या पैशांसाठी मोठ्या प्रमाणात व्याजही मिळते. CITES प्रणालीद्वारे 5 लाख रुपयांपर्यंतचे पात्र दावे साधारणपणे तीन दिवसांत निकाली काढले जातात.

मात्र, दाव्यांचा हा जलद निपटारा तुमच्या नोंदी किती अचूक आहेत, यावर अवलंबून असतो. केवायसीशिवाय अनेक गोष्टी यात महत्वाच्या ठरतात. मात्र, पीएफ काढण्याचा प्रक्रिया आता सोपी करण्यात आली. सप्टेंबर 2014 पासून लागू असलेल्या EPS-95 योजनेअंतर्गत 1000 रुपयांच्या किमान मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याबाबत चर्चा सुरू आहे.

ही चर्चा सुरू असून याबाबत EPFO बोर्डाने कोणतीही घोषणा केली नाही. पण एक अशी चर्चा आहे की, तीन पट्टीने हे वाढवण्याची शक्यता आहे. या नियमात अलीकडेच सुधारणा करण्यात आली असून अनिवार्य पेन्शन योगदानासाठी वेतनाची मर्यादा 15,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. EPFO बोर्डाने अनेक नियमात बदल केला. सोपी प्रक्रिया करण्यावर त्यांनी भर दिला आहे.

Follow Us
चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त....
Kartiki Ekadashi : चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी वारकऱ्यांची प्रार्थना
कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील..
Beed Farmer Issue : कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील शेतकरी संकटात
लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी
Latur Water Issue : लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी आणण्याच्या मुद्द्यावरून जुंपली
छगन भुजबळ आणि अमोल कोल्हे एकाच मंचावर; ओतूरच्या अधिवेशनात राजकीय चर्चा
Chhagan Bhujbal-Amol Kolhe : छगन भुजबळ आणि अमोल कोल्हे एकाच मंचावर; ओतूरच्या अधिवेशनात राजकीय चर्चांना उधाण
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, भाजपचा...
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, पत्रकार परिषद घेऊन भाजपचा मोठा दावा
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला...
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला; PM मोदींबाबतही मोठा दावा!
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती...
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती, दिल्ली कोर्टात महत्त्वाची सुनावणी
रायगडच्या राजकारणात ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा...
रायगडच्या राजकारणात वादा ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा, म्हणाले 'उलटी गिनती सुरू'
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा...
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; जरांगे...
Pune : पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; मनोज जरांगेंवर गंभीर आरोप!