AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात केस गळण्यामागे असू शकतात तुमच्याच या चुका; आजच बदला हेअर केअरची पद्धत

Tips to Stop Hair Fall in Winter: हिवाळ्यात थंड आणि कोरड्या हवामानामुळे केस कोरडे होणे, तुटणे आणि केसगळती वाढणे अशा समस्या जाणवू शकतात. अशा वेळी केसांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. हेअर फॉल कमी करण्यासाठी हिवाळ्यात कोणत्या चुका टाळाव्यात, जाणून घेऊया. 

हिवाळ्यात केस गळण्यामागे असू शकतात तुमच्याच या चुका; आजच बदला हेअर केअरची पद्धत
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Edited By: | Updated on: Nov 21, 2026 | 1:58 PM
Share

हिवाळा आपल्यासोबत केसांशी संबंधित अनेक समस्या घेऊन येतो. थंडीच्या दिवसांत केस कोरडे होणे, तुटणे आणि केसगळती वाढणे अशा समस्या अनेकांना जाणवतात. तापमानात घट आणि हवेमधील आर्द्रता कमी झाल्यामुळे केसांमधील नैसर्गिक ओलावा कमी होतो. परिणामी केस कमकुवत आणि निस्तेज होऊ लागतात. अशा वेळी केसांची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. अनेकदा रोजच्या केसांची निगा राखताना नकळत काही चुका होतात, ज्यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते. तुम्हीही केसगळतीच्या समस्येने त्रस्त असाल, तर हिवाळ्यात या चुका करणे टाळा.

केसांना तेल न लावणे

अनेक लोक केसांना तेल लावणे टाळतात. मात्र, हिवाळ्यात ही सवय केसांसाठी नुकसानकारक ठरू शकते. तापमानात घट आणि आर्द्रता कमी झाल्यामुळे केसांमधील नैसर्गिक ओलावा कमी होतो. त्यामुळे केस कोरडे आणि कमकुवत होऊन तुटू लागतात. अशा वेळी केसांमधील ओलावा टिकवण्यासाठी आठवड्यातून दोनदा कोमट तेलाने केसांना आणि टाळूला हलक्या हाताने मसाज करा.

शॅम्पू पाण्यात मिसळून न वापरणे

केस धुण्यापूर्वी शॅम्पू थेट केसांवर लावण्याऐवजी पाण्यात मिसळून वापरणे चांगले ठरते. यासाठी एका भाग शॅम्पूमध्ये तीन भाग पाणी मिसळा. असे केल्याने शॅम्पू केसांवर समान प्रमाणात पसरतो आणि त्याचा अतिवापर टाळता येतो. तसेच केस आणि टाळू स्वच्छ होण्यास मदत होते.

गरम पाण्याने केस धुणे

हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक जण केस धुण्यासाठी खूप गरम पाण्याचा वापर करतात. मात्र, यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल कमी होऊन ते अधिक कोरडे आणि निस्तेज होऊ शकतात. त्यामुळे केस धुण्यासाठी खूप गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा. यामुळे केसांचा नैसर्गिक ओलावा टिकवण्यास मदत होईल.

हेअर ड्रायरचा अतिवापर करणे

हिवाळ्यात केस लवकर सुकवण्यासाठी अनेक जण हेअर ड्रायर वापरतात. मात्र, ड्रायरमधून बाहेर पडणाऱ्या गरम हवेमुळे केसांचे नुकसान होऊ शकते. सतत ड्रायर वापरल्यास केस कोरडे आणि कमकुवत होऊन तुटण्याची शक्यता वाढते. त्यामुळे शक्यतो केस नैसर्गिक पद्धतीने सुकू द्या. ड्रायर वापरणे आवश्यक असल्यास कमी तापमानावर त्याचा वापर करा.

हेअर मास्क न लावणे

ज्याप्रमाणे त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे केसांचे आरोग्य राखणेही गरजेचे आहे. हिवाळ्यात केसांचा कोरडेपणा वाढत असल्याने आठवड्यातून एकदा हेअर मास्क लावा. यामुळे केसांना अतिरिक्त ओलावा मिळतो आणि ते मऊ व मुलायम राहण्यास मदत होते. तसेच केसांचा गुंता कमी होऊन ते मधूनच तुटण्याचे प्रमाणही कमी होऊ शकते.

Follow Us
चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त....
Kartiki Ekadashi : चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी वारकऱ्यांची प्रार्थना
कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील..
Beed Farmer Issue : कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील शेतकरी संकटात
लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी
Latur Water Issue : लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी आणण्याच्या मुद्द्यावरून जुंपली
छगन भुजबळ आणि अमोल कोल्हे एकाच मंचावर; ओतूरच्या अधिवेशनात राजकीय चर्चा
Chhagan Bhujbal-Amol Kolhe : छगन भुजबळ आणि अमोल कोल्हे एकाच मंचावर; ओतूरच्या अधिवेशनात राजकीय चर्चांना उधाण
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, भाजपचा...
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, पत्रकार परिषद घेऊन भाजपचा मोठा दावा
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला...
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला; PM मोदींबाबतही मोठा दावा!
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती...
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती, दिल्ली कोर्टात महत्त्वाची सुनावणी
रायगडच्या राजकारणात ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा...
रायगडच्या राजकारणात वादा ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा, म्हणाले 'उलटी गिनती सुरू'
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा...
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; जरांगे...
Pune : पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; मनोज जरांगेंवर गंभीर आरोप!