AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hindu Population: या मुस्लिम देशात हिंदू होणार दुप्पट, त्या अहवालाने सर्वांनाच मोठा धक्का

Hindu Population Double: जागतिक स्तरावर विविध धार्मिक गटांची लोकसंख्या किती वाढणार याविषयीचा एक अहवाल सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यानुसार, मुस्लिम लोकसंख्या जगात सर्वाधिक वेगाने वाढत आहे. पण त्याचवेळी हिंदूविषयी एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. काय आहे तो दावा?

Hindu Population: या मुस्लिम देशात हिंदू होणार दुप्पट, त्या अहवालाने सर्वांनाच मोठा धक्का
या मुस्लिम देशात हिंदू होणार दुप्पट, त्या अहवालाने सर्वांनाच मोठा धक्का
| Updated on: Nov 21, 2026 | 2:17 PM
Share

Hindu Population Double: जगभरातच नाही तर भारतातही सध्या प्रसिद्ध संशोधन संस्था प्यू रिसर्च सेंटरच्या (Pew Research Centre) ताज्या अहवालाची खास चर्चा आहे. त्यानुसार जगातील विविध धार्मिक गटांच्या लोकसंख्येत मोठा बदल होऊ शकतो. या अहवालातील अंदाजानुसार, 2025 पर्यंत जगात इस्लाम धर्माचे पालन करणार्‍यांची संख्या ख्रिश्चन धर्मियांपेक्षा वाढणार आहे. 2020 मध्ये जगात सुमारे 227 कोटी ख्रिश्चन आणि 220 कोटी मुस्लिम होते. नव्या दाव्यानुसार, 2035 पर्यंत जागतिक मुस्लिम लोकसंख्या 257 कोटींपर्यंत पोहचू शकते. तर ख्रिश्चनांची संख्या 252 कोटी इतकी असेल. असाच कल कायम राहिला, तर 2070 पर्यंत जगात मुस्लिमांची लोकसंख्या 360 कोटींचा टप्पा ओलंडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचवेळी हिंदूविषयी एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. काय आहे तो दावा?

पाकिस्तानबाबत अहवालात काय मत?

प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार, 2020 मध्ये पाकिस्तानातील हिंदू लोकसंख्या जवळपास 50.3 लाख इतकी होती. जी येत्या 44 वर्षात म्हणजे 2070 पर्यंत वाढून 1.03 कोटी होईल. नैसर्गिक लोकसंख्या वाढ आणि मृत्यू दरापेक्षा जन्म दराचे अधिक प्रमाण हे यामागील कारण असू शकेल असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. भारतापेक्षा जिथे हिंदूंची लोकसंख्या अधिक आहे, अशा देशांमध्ये पाकिस्तानमधील हिंदूची लोकसंख्या वाढीचा वेग लक्षणीय असू शकतो, असा दावा अहवालात करण्यात आला आहे.

जागतिक स्तरावर हिंदू लोकसंख्येची काय स्थिती?

Pew Research Centre च्या अहवालानुसार, जागतिक स्तरावर हिंदूंच्या लोकसंख्या वाढीचा वेग मंदावणार आहे. जगभरातील हिंदूंची एकूण लोकसंख्या 2020 मध्ये 1.2 अब्ज इतकी होती. इतर धर्मियांच्या लोकसंख्येचा वेग पाहता हिंदूंची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढणार नाही. अहवालातील दाव्यानुसार 2070 पर्यंत ही संख्या 1.4 अब्ज इतकीच वाढणार आहे. असे असले तरी भारतात हिंदू हे बहुसंख्य असतील. हिंदू लोकसंख्येत या कालावधीत जवळपास 17.6 कोटींची भर पडण्याचा अंदाज आहे. तर स्थलांतरामुळे अमेरिकेतही हिंदूंची संख्या वाढणार आहे. अमेरिका जगातील पाचव्या क्रमाकांचा मोठा हिंदू लोकसंख्या असलेला देश ठरू शकतो. येत्या काही काळात हा बदल दिसण्याची शक्यता या संस्थेने अहवालात नमूद केली आहे.

Follow Us
चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त....
Kartiki Ekadashi : चंद्रभागेच्या वाळवंटात विठ्ठल भक्तांची मांदियाळी; दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी वारकऱ्यांची प्रार्थना
कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील..
Beed Farmer Issue : कष्टाने टोमॅटोची लागवड केली, पण पाण्याअभावी स्वप्नांवर पाणी; बीडमधील शेतकरी संकटात
लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी
Latur Water Issue : लातूरच्या पाणीप्रश्नावरून अमित देशमुख विरुद्ध नवनाथ बन; रेल्वेने पाणी आणण्याच्या मुद्द्यावरून जुंपली
छगन भुजबळ आणि अमोल कोल्हे एकाच मंचावर; ओतूरच्या अधिवेशनात राजकीय चर्चा
Chhagan Bhujbal-Amol Kolhe : छगन भुजबळ आणि अमोल कोल्हे एकाच मंचावर; ओतूरच्या अधिवेशनात राजकीय चर्चांना उधाण
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, भाजपचा...
रोहित पवारांचा सुद्धा त्याच VSR कंपनीच्या विमानातून प्रवास, पत्रकार परिषद घेऊन भाजपचा मोठा दावा
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला...
नाशिकमधील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून संजय राऊतांचा भाजपला टोला; PM मोदींबाबतही मोठा दावा!
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती...
नीट पेपरफुटी प्रकरणाला निर्णायक वळण! आज 14 आरोपींवर आरोप निश्चिती, दिल्ली कोर्टात महत्त्वाची सुनावणी
रायगडच्या राजकारणात ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा...
रायगडच्या राजकारणात वादा ठिणगी! महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा, म्हणाले 'उलटी गिनती सुरू'
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा...
गोशाळांना मोठा दिलासा! जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; जरांगे...
Pune : पुण्यात ठाकरे सेनेच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; मनोज जरांगेंवर गंभीर आरोप!