Sharad Pawar : पक्षात फूट पडेल असं कधी वाटलं नव्हतं, पण…26 व्या वर्धापनदिनी शरद पवार काय म्हणाले?

Sharad Pawar : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 26 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलताना काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. "उद्याच्या निवडणुकीत 50 टक्के जागा भगिनींना द्यायच्या आहेत. हा धोरणात्मक निर्णय आपण घेतला आहे. तो यशस्वी करण्याचं काम दोन-तीन महिन्यात करायचं आहे" असं शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar : पक्षात फूट पडेल असं कधी वाटलं नव्हतं, पण...26 व्या वर्धापनदिनी शरद पवार काय म्हणाले?
Sharad Pawar
| Updated on: Jun 10, 2025 | 1:31 PM

“प्रशासन चालवायला सामान्य कुटुंबातल्या प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळाली तर तो कर्तुत्व दाखवू शकतो, राज्य चालवू शकतो. अनेकांची नाव सांगता येतील” असं शरद पवार पक्ष स्थापनेच्या 26 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना म्हणाले. “जयंत पाटलांनी अर्थमंत्री म्हणून 10 वर्ष काम केलं. . राष्ट्रवादी पक्ष सामान्य कुटुंबातल्या तरुणांना संधी देतो. कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. सामान्य माणसाला संधी मिळाली की तो कर्तुत्व दाखवू शकतो” असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांनी पक्षाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलताना सहकाऱ्यांच कौतुक केलं. “या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाल्यानंतर त्यांनी अनेक निर्णय असे घेतले त्या निर्णयाचा परिणाम राज्यात झाला. महिला सक्षमीकरण आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशावर जो प्रसंग आला. जी कारवाई केली, त्याची माहिती सांगण्याच काम दोन भगिनींनी केलं. आर्मी आणि एअर फोर्समधल्या त्या भगिनी होत्या. त्याचा अभिमान वाटला” असं शरद पवार म्हणाले.

“विश्वास निर्माण करण्याच काम भगिनी सुद्धा करतात. जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुका दोन-तीन महिन्यांवर आल्या आहेत. आपल्याला 50 टक्के भगिनींना निवडून द्यायच आहे. कर्तुत्वाचा वाटा पुरुषांचाच असतो यावर माझा विश्वास नाही. भगिनींना संधी मिळाली तर त्या सुद्धा कर्तुत्व दाखवू शकतात. उद्याच्या निवडणुकीत 50 टक्के जागा भगिनींना द्यायच्या आहेत. हा धोरणात्मक निर्णय आपण घेतला आहे. तो यशस्वी करण्याचं काम दोन-तीन महिन्यात करायचं आहे” असं शरद पवार म्हणाले.

शरद पवारांनी 1980 सालच काय उदहारण दिलं?

“काही संकट आली, तर नाउमेद न होता पुढे नेण्याच काम तुम्ही लोकांनी केलं. पक्षात फूट पडली. फूट पडेल असं कधी वाटत नव्हतं, पण पडली. मी याच्यासंबंधी अधिक भाष्य करु इच्छित नाही. जे राहिले ते विचाराने राहिले” असं शरद पवार म्हणाले. त्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी 1980 च उदहारण दिलं. “1980 साली माझ्या हातात सत्ता नव्हती, त्याआधी होती. निवडणुका आल्या, 50 आमदार निवडून आले. सहा शिल्लक राहिले, बाकी पक्ष सोडून गेले. सहा राहिले त्यातले एक मला इथे दिसतायत कमल किशोर कदम. आमचा पक्ष सहाजणांवर आला. त्यानंतर पुन्हा निवडणूक आली. राष्ट्रवादीची संख्या 72 झाली. राज्य सरकारमध्ये पुन्हा काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे चिंता करु नका. आपण एकसंध राहू. जनतेशी बांधिलकी ठेवायची आहे” असं शरद पवार म्हणाले.