शरद पवार घेणार राजनाथ सिंग यांची भेट, कृषी कायद्याविरोधात तोडगा निघणार का?

शरद पवार शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यावर राजनाथ सिंग यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शरद पवार घेणार राजनाथ सिंग यांची भेट, कृषी कायद्याविरोधात तोडगा निघणार का?
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 10:01 AM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज सकाळी 11 वाजता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेणार आहेत. या भेटीत देशात सुरू असलेल्या कृषी कायद्याविरोधातील आंदोलनावर चर्चा करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुण्यातील विमानतळवर ही भेट होणार आहे. शरद पवार शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यावर राजनाथ सिंग यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Sharad Pawar to meet Rajnath Singh in pune will there be a solution against agriculture law)

या महत्त्वाच्या भेटीमध्ये काही तोडगा निघून शेतकऱ्यांना दिलासादायक चर्चा होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. खरंतर, केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी गेल्या 13 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. यासाठी आज भारत बंदची हाकही देण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांनीही केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध केला आहे.

कृषीविधेयक तातडीने रद्द करावं अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. याविषयी बोलताना त्यांनी राज्यभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह यांच्यावर टीका केली होती. ‘राज्यसभेच्या उपाध्यक्षांनी कृषीविधेयकावर सदस्यांना बाजू मांडू दिली नाही. उलट सदस्यांचा विरोध डावलून तात्काळ आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर केलं आणि भावना व्यक्त करणाऱ्या सदस्यांना निलंबितही केलं. मी गेली 50 वर्षे संसदीय राजकारण करत असून गेल्या 50 वर्षांत मी राज्यसभेच्या उपाध्यक्षांचं असं वर्तन पाहिलं नाही’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह यांच्यावर टीका केली होती. तसेच हे विधेयक तात्काळ रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली.

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन कृषीविधेयकावरून राज्यसभेत झालेल्या गोंधळावर आपली भूमिका मांडली होती. कृषी विधेयक नियमाच्या विरुद्ध आहे, असं सदस्य सांगत होते. पण त्यांना प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळे सदस्यांनी वेलमध्ये धाव घेऊन नियमांचं पुस्तक दाखवण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात हे पुस्तक फाडलं गेलं. किमान सदस्य काय नियम सांगत आहेत. हे ऐकून घेण्याची अपेक्षा उपाध्यक्षांकडून होती. पण त्यांनी कुणाचंही ऐकलं नाही. त्यांनी तातडीने आवाजी मतदान घेऊन हे विधेयक मंजूर केलं. सदस्यांशी चर्चा न करता हे मतदान घेण्यात आलं. गेल्या 50 वर्षांत पीठासीन अधिकाऱ्याचं असं वर्तन मी पाहिलं नाही, अशी टीका करतानाच या विधेयकावर हवी तशी चर्चा होऊ दिली नाही. सत्ताधाऱ्यांनी घडू दिली नाही. त्यामुळे हे शेतकरी विरोधी विधेयक तात्काळ रद्द करण्यात यावं, अशी मागणी पवारांनी केली होती.

राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह हे ज्येष्ठ समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांच्या विचारांवर चालणारे आहेत. पण कालच्या वर्तनांनी त्यांनी कर्पूरी ठाकूर यांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. सिंह यांच्याकडून आमचा भ्रम निरास झाला आहे, असं सांगतानाच सदस्यांना निलंबित करून आणि त्यांचा अधिकार हिरावून घेण्यात आला. त्यामुळे या सदस्यांनी गांधीजींच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेष आंदोलन केलं. सिंह यांनी तिथे जाऊन गांधीगिरी करण्याचा प्रयत्न केला, असंही त्यांनी सांगितलं होतं. (Sharad Pawar to meet Rajnath Singh in pune will there be a solution against agriculture law)

इतर बातम्या –

Bharat Bandh : मुंबईकरांना आज दूध आणि भाजीपाला मिळणार का? पाहा राज्याचा रिअ‍ॅलिटी चेक

‘आजच्या आंदोलनात फूट पाडण्याचेही प्रयत्न करायचे असेच सत्ताधाऱ्यांचे मनसुबे’

(Sharad Pawar to meet Rajnath Singh in pune will there be a solution against agriculture law)

Non Stop LIVE Update
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.
कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, कशेडी बोगद्यातून तुम्ही प्रवास करताय?
कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, कशेडी बोगद्यातून तुम्ही प्रवास करताय?.
शिंदेंच्या उमेदवारांची ठाकरे गटाशी थेट लढत, शिंदेंनी कुणाला दिली संधी?
शिंदेंच्या उमेदवारांची ठाकरे गटाशी थेट लढत, शिंदेंनी कुणाला दिली संधी?.