AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पडळकरांचा कार्यकर्ता अपहरण प्रकरणात मोठं ट्विस्ट, रोहित पवारांनी दाखवला थेट तो फोटो, केले गंभीर आरोप

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एका कार्यकर्त्याचं अपहरण करून, त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पत्रकार परिषद घेऊन रोहित पवार यांनी मोठा आरोप केला आहे.

पडळकरांचा कार्यकर्ता अपहरण प्रकरणात मोठं ट्विस्ट, रोहित पवारांनी दाखवला थेट तो फोटो, केले गंभीर आरोप
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 08, 2025 | 3:34 PM
Share

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एका कार्यकर्त्याचं अपहरण करून, त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शरणू हांडे असे मारहाण करण्यात आलेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे. शरणू हांडे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमित सुरवसे याच्यावर शरणू हांडे यांच्या अपहरणाचा तसेच त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे, पोलिसांनी या प्रकरणात अमित सुरवसे आणि त्याच्या 6 साथीदारांना अटक केली आहे, दरम्यान त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी रुग्णालयात जाऊन शरणू हांडे यांची भेट घेतली, त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान गोपिचंद पडळकर यांच्या आरोपांनंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

हांडे आणि सुरवसे हे मित्र आहेत. एकमेकांना ते फार पूर्वीपासून ओळखतात. मात्र राजकीय दृष्टीकोनातून त्यांच्यामध्ये अनेकदा वाद झालेले आहेत. अमित सुरवसेला 30 जून रोजी फार भयानक पद्धतीनं मारलं होतं, त्याचे व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आले होते, त्याला फार खालच्या लेव्हला जाऊन बोललं गेलं होतं, आणि त्यामुळे तो मनातून दुखावला होता. आता आमच्या सर्वांचं म्हणणं असं आहे की कालच्या प्रकरणाला जर अमित सुरवसे जबाबदार असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी, पण त्याच्यावर कलम टाकत असताना तुम्ही कुठले कलम टाकत आहात, हे सुद्धा पोलिसांनी सांगितलं पाहिजे. 30 जूनला अमित सुरवसे या कार्यकर्त्याला ज्या पद्धतीनं मारलं गेलं, त्याचे व्हिडीओ लोकांसमोर आले आहेत. मग तुम्ही ज्या पद्धतीची कारवाई ही सुरवसेंवर करणार आहात, त्याच पद्धतीची कारवाई तुम्ही हांडेवर करणार आहात का? असा प्रश्न आम्ही सर्वजण करतो.

काल जेव्हा ही घटना घडली होती, आणि आज तिथे जे पडळकर गेले होते, पडळकरांसोबत काही लोक होती, त्याच्यामध्ये शरण हांडेच्या कानात एक माऊल हवणार नावाचा कार्यकर्ता काय बोलतो? याचा एक फोटो आहे, व्हिडीओ आहे. तो काय बोलला? त्याच्यानंतर अचानकच या हांडेंनी माझं नाव तिथे घेतलं. हा जो माऊली हवण आहे, हा भाजपचा कार्यकर्ता आहे. तो किसान सेलचा भाजपचा पदाधिकारी आहे. तो ांडेच्या कानात काहीतरी सांगतो आणि हांडे लगेचच माझं नावं घेतो, या सर्वांमध्ये मुद्दामहून मला फ्रेम करण्याचा प्रयत्न केला जात आहे का? असा आमच्या सर्वांचा सवाल आहे, असं यावेळी रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Follow Us
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी BMC तील नगरसेवक
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी भाजपनं BMC तील नगरसेवकाला रुग्णालयातून आणलं, Video व्हायरल
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? बड्या नेत्याचं भाकित ऐकून चकित व्हाल
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवास..
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे... नेमकं प्रकरण काय?
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे...
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे... फडणवीसांचा उल्लेख करत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच...
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच... मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु