विलिनीकरण की भाजपसोबत जायचं? शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं? थेट बड्या नेत्यानेच सांगितली आतली खबर

अधिवेशन सुरू असताना आमदारस खासदार यांच्यासोबत चर्चा करण्याचा पवार साहेबांचा मानस होता. कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन त्यांनी केलेले नाही. मात्र परिस्थितीची माहिती घेतली आहे. इकडच्या तिकडच्या विषयावर चर्चा झाली, असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

विलिनीकरण की भाजपसोबत जायचं? शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं? थेट बड्या नेत्यानेच सांगितली आतली खबर
sharad pawar
| Updated on: Jul 08, 2026 | 6:47 PM

Sharad Pawar Party : सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात फूट पडल्यानंतर लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतही फूट पडू शकते, असा दावा केला जातोय. तर शरद पवार यांचा पक्ष लवकरच एनडीएत सहभागी होऊ शकतो, असाही दावा काही लोक करत आहेत. दरम्यान, एकीकडे ही चर्चा रंगलेली असताना खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात भेट झाली. या भेटीची सगळीकडे चर्चा रंगली आहे.

योगायोगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केबिन…

याच भेटीबाबत आता शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एनडीएत सहभागी होण्याबाबतही पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. सीमा प्रश्नासंदर्भात आमची बैठक कंपली होती. या बैठकीला सर्व आमदार उपस्थित होते. त्यामुळे सर्वांना भेटावं असं ठरलं. योगायोगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केबिन जवळ होती. म्हणूनच एकनाथ शिंदेची साहेबांची केबिन घेतली आणि तिथे बैठक झाली. हा राजकारणाचा विषय होऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण शशिकांत शिंदे यांनी दिले.

मी पुन्हा एकदा सांगतो की…

तसेच, पुढे बोलताना शरद पवार यांच्या पक्षाच्या विलीनीकरणाबाबत तसेच एनडीएत सामील होण्याच्या चर्चांवरही शशिकांत शिंदे यांनी उत्तर दिले. आमच्या पक्षाध्यांनीच सांगितले आहे की विलिनीकरणाची कुठलीही चर्चा नाही. NDA त जाण्याची चर्चा नाही. गेल्या तीन- चार दिवसापासून जी चर्चा सुरु आहे तसे काहीच नाही. मी पुन्हा एकदा सांगतो विलिनिकरणाची कुठलीही चर्चा नाही. याला कुठल्याही प्रकारचा आधार नाही, असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

भाजपसोबत जाण्याचीही चर्चा झालेली नाही

अधिवेशन सुरू असताना आमदारस खासदार यांच्यासोबत चर्चा करण्याचा पवार साहेबांचा मानस होता. कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन त्यांनी केलेले नाही. मात्र परिस्थितीची माहिती घेतली आहे. इकडच्या तिकडच्या विषयावर चर्चा झाली. त्यांनी अतिवृष्टीची माहिती घेतली. बैठकीत विलीनीकरणाची किंवा भाजपसोबत जाण्याचीही चर्चा झालेली नाही, असेही शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.

Follow Us