AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडियावर फटका, तब्बल 35 हजार लोकांनी केले अनफॉलो..

खासदार ओमराजे निंबाळकर सोशल मीडियावर तूफान चर्चेत असतात. ठाकरे गटाची साथ सोडून ओमराजे निंबाळकर यांनी शिंदेंचा हात धरला. शिवसेना शिंदे गटात ओमराजे निंबाळकर गेल्यानंतर मोठा विरोध झाला. विविध चर्चा रंगताना दिसल्या.

ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडियावर फटका, तब्बल 35 हजार लोकांनी केले अनफॉलो..
Omraje Nimbalkar
| Updated on: Aug 26, 2026 | 1:47 PM
Share

शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात 6 खासदारांनी प्रवेश केला. या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्याही नावाचा समावेश होता. ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम करत शिंदेंची साथ दिली. मात्र, यादरम्यान ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. ओमराजे निंबाळकर यांनी वडिलांचा केसचा निकाल आपल्या बाजूने लागावा, याकरिताच शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप झाला. मात्र, प्रत्यक्षात ओमराजे निंबाळकर यांच्या बाजूने हा निकाल लागला नाही. पुराव्या अभावी आरोपींची सुटका करण्यात आली. ओमराजे निंबाळकर सतत चर्चेत असलेले खासदार आहेत. त्यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. शिवसेना शिंदे गटात दाखल झाल्यानंतरही ओमराजे निंबाळकर काही दिवस सोशल मीडियावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सोशल मीडियावर फॉलो करताना दिसले.

आता ओमराजे निंबाळकर यांनी मोठा निर्णय घेतला. ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरे पिता पुत्रांना अनफॉलो केले.  धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे. थेट 35 हजार फॉलोवर्स त्यांचे सोशल मीडियावर कमी झालेत. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांच्या सोशल मीडिया फॉलोअर्समध्ये मोठी घट होताना दिसतंय.

पक्षांतर केल्यापासून खासदार ओमराजे निंबाळकर यांचे 35 हजार फॉलोवर्स कमी झाले आहेत. ठाकरे पिता पुत्रांना अनफॉलो करणारे खासदार ओम राजे जिल्ह्यातील ठाकरे शिवसेनेच्या दोन्ही आमदारांना मात्र फॉलो करतात. त्यांच्या चांगली मैत्री आहे. त्यांनी पक्ष सोडला पण आपली मैत्री ही कायम ठेवली आहे. आमदार कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांची मैत्री तर सर्वत्र चर्चेत राहिली आहे.

पण आता अखेर ठाकरेंना ओमराजे निंबाळकर यांनी अनफॉलो केले. पण ठाकरे गटातील आमदारांना फॉलो करणे कायम ठेवले. ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना अनफॉलो त्यातच त्यांच्या फॉलोवर्समध्ये झपाट्याने कमी होताना दिसत आहे. काहींनी त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर नाराजीही जाहीर केली होती.

Follow Us
मुंबईतील वडापाव विक्रेत्यांनी घेतली तुकाराम मुंढेंची धास्ती,
मुंबईतील वडापाव विक्रेत्यांनी घेतली तुकाराम मुंढेंची धास्ती, असं काही केलं की...
विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, कारण..
मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, सर्वात मोठा बदल घडणार?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थक...
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क...
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण
याला म्हणतात luxurious! रुपाली चाकणकर यांचं हॉटेल व्यवसायात पदार्पण
पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री...
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या...
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसणाचे दर तब्बल 200 रुपये किलोपर्यंत
सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप,
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख...