AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिल्पा शेट्टी शिर्डीत, साईंना सोन्याचा मुकूट अर्पण, किंमत….

मनोज गाडेकर, टीव्ही 9 मराठी, शिर्डी: अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या परिवारासह शिर्डीच्या साई बाबांच्या दरबारी हजेरी लावली. बाबांच्या धुपारतीला हजेरी लावत, सर्वांनी साई समाधीचे दर्शन घेतले. शिल्पा शेट्टीसोबत पती राज कुंद्रा, आई, मुलगा आणि बहीण शमिता शेट्टी हे यावेळी उपस्थित होते. यावेळी शिल्पाने साईबाबांना 800 ग्रॅम सोन्याचा मुकूट अर्पण केला. या मुकूटाची किंमत अंदाजे 25 […]

शिल्पा शेट्टी शिर्डीत, साईंना सोन्याचा मुकूट अर्पण, किंमत....
| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM
Share

मनोज गाडेकर, टीव्ही 9 मराठी, शिर्डी: अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या परिवारासह शिर्डीच्या साई बाबांच्या दरबारी हजेरी लावली. बाबांच्या धुपारतीला हजेरी लावत, सर्वांनी साई समाधीचे दर्शन घेतले. शिल्पा शेट्टीसोबत पती राज कुंद्रा, आई, मुलगा आणि बहीण शमिता शेट्टी हे यावेळी उपस्थित होते. यावेळी शिल्पाने साईबाबांना 800 ग्रॅम सोन्याचा मुकूट अर्पण केला. या मुकूटाची किंमत अंदाजे 25 लाख रुपयांच्या आसपास आहे.

शिल्पा गुरुवारी संध्याकाळी सहपरिवार साईदर्शनासाठी पोहोचली. सोन्याचं दान किती आहे, यापेक्षा मनातील श्रद्धा आणि भाव महत्वाचा असल्याचं तिने यावेळी सांगितलं.

शिल्पा शेट्टी शिर्डीच्या साईबाबांची निस्सीम भक्त असून, ती वर्षातून किमान एकदातरी साईदर्शनासाठी आवर्जून शिर्डीत येते. शिल्पाच्या विनंतीवरुन बाबांना अर्पण केलेला सुवर्णमुकूट साईबाबांच्या मूर्तीला काही वेळ परिधान करण्यात आला.

त्यानंतर साईबाबांच्या धुपारतीतही शिल्पाने संपूर्ण परिवारासह उपस्थिती दर्शवली.

दरम्यान तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी आणि भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. साईबाबा संस्थानच्यावतीने उपजिल्हाधिकारी मनोज घोडे यांनी त्यांचा शाल-मूर्ती देऊन सत्कार केला.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.