Electricity Hike 2022: महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना शिंदे सरकार देणार वीज दरवाढीचा शॉक; वीज दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी

शिंदे सरकारने विजेच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरवाढीला मंजुरीही देण्यात आली आहे. विजेच्या दरात 10 ते 20 टक्के वाढ करण्याचा हा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला मंजुरीही देण्यात आली आहे. यात घरगुती,व्यावसायिक आणि औद्योगिक परिसरातील वीज ग्राहकांचा समावेश आहे.

Electricity Hike 2022: महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना शिंदे सरकार देणार वीज दरवाढीचा शॉक; वीज दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी
वीज दरवाढीचा शॉकImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 10:18 PM

मुंबई : महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेला शिंदे सरकार देणार वीज दरवाढीचा(Electricity Hike ) शॉक देणार आहे. शिंदे सरकारने विजेच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरवाढीला मंजुरीही देण्यात आली आहे. विजेच्या दरात 10 ते 20 टक्के वाढ करण्याचा हा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला मंजुरीही देण्यात आली आहे. यात घरगुती,व्यावसायिक आणि औद्योगिक परिसरातील वीज ग्राहकांचा समावेश आहे. यामुळे सर्वसामान्यांपासून सर्वांनाच याचा जबरदस्त फटका बसणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(chief minister eknath shinde) यांनी केलेल्या घोषणेनुसार राज्यात 2018 मध्ये प्रारंभ करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेत मुंबई येथे झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. या बैठकीतही दरवाढीबाबत चर्चा झाल्याचे समजते वीज उत्पादन खर्च वाढल्याने वीज दरवाढीचा प्रस्ताव

दरम्यान, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड(MSEDCL) यांच्या दाव्यानुसार, गेल्या 2 वर्षांत इंधन किंमतीतीत मोठी वाढ झाली आहे. कोरोना महामारीमुळे ग्राहकांकडून कंपनीने कुठलीही दरवाढ न करता ज्यादा बिल आकारले नाही. परंतू यंदा इंधन दरात पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील 5 महिने ग्राहकांकडून हा वाढीव खर्च वसूल करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. दरवाढीचा शॉक केवळ घरगुती वापरकर्त्या ग्राहकांनाच बसेल असे नाही तर औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांनाही वीजदरवाढीचा शॉक सहन करावा लागणार आहे.

परंतू, वीज उत्पादन खर्च वाढल्याने आणि कंपन्यांचा तोटा भरून काढण्यासाठी आता वीज दरवाढ करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचा दावा वीज कंपन्यांनी केला आहे. महाराष्ट्रात युनिटमागे दोन रुपये वीज वाढ होण्याचा दावा झी बिझनेसने केला आहे तर देशाची राजधानी दिल्लीतील विद्युत विनियामक आयोगाने(DERC) दिल्लीतंर्गत विविध भागात वीजेच्या दरात 2 ते 6 रुपये वाढीला मंजूरी दिली आहे.

शेतकऱ्यांना दिवसाही मिळणार वीज

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेनुसार राज्यात 2018 मध्ये प्रारंभ करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आढावा घेण्यात आला. राज्यातील शेतकऱ्यांना थकीत कृषिपंपाचा मार्च 2022 पर्यंतचा अनुशेष दूर करण्यात यावा आणि कृषिपंपाचा अनुशेष दूर करताना सौर ऊर्जेला प्राधान्य देत, मार्च 2022 पर्यंतचे संपूर्ण उद्दिष्ट 6 महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिले.

काय आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना

विकेंद्रित सौर निर्मितीतून 4500 मेगा वॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट या योजनेत आहे. अशा प्रकल्पांसाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्यात याव्या अशी सूचना करत या योजना वेगाने कार्यान्वित करण्याचे निर्देशही देण्यात आले. किमान 30 टक्के फिडर यावर्षी सौर उर्जेवर जातील, या दृष्टीने तत्काळ नियोजन करण्यात यावे आणि त्यादृष्टीने पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना देखील करण्यात आल्या.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.