मोठी बातमी! शिंदेंचं सरकार त्या सीडीमुळे आलं; बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

सध्या राज्यात हनी ट्रॅपचा मुद्दा चांगलाच गाजत आहे, यावर प्रतिक्रिया देताना बड्या नेत्यानं मोठं वक्तव्य केलं आहे, या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

मोठी बातमी! शिंदेंचं सरकार त्या सीडीमुळे आलं; बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 19, 2025 | 5:12 PM

राज्यात सध्या हनी ट्रॅप प्रकरण चांगलंच गाजत आहे, राजकीय वर्तुळात हनी ट्रॅप प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. हे सर्व सुरू असताना आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे, या दाव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. हनी ट्रॅप प्रकरणामध्ये सरकार आणि विरोधकांकडे मोठी माहिती आहे, शिंदेंचं सरकार नाशिकच्या सीडीमुळे आलं, हनी ट्रॅपचे पुरावे द्यायचे झाले तर तिकीट लावावे लागतील असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले वडेट्टीवार?

काल हनी ट्रॅपवरून हनी देखील नाही आणि ट्रॅपही नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. पण त्यासंदर्भातील फार मोठी माहिती सरकारकडेही आहे, आणि विरोधकांकडेही आहे.कोणाच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा कोणालाही अधिकार नाही, म्हणून आपण गप्प आहोत. मागच्या वेळेस शिंदे सरकार जे आलं, जी सत्ता पालट झाली ती सीडीमुळेच झाली, एवढं मोठं ते प्रकरण आहे, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, या प्रकरणात खूप मोठी माणसं आहेत. सध्या त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही, ज्यावेळेस आम्ही ते दाखवू त्यावेळी आम्हाला पुराव्यावर दहा हजारांचे, वीस हजारांचे तिकीटंच लावावे लागतील, आणि ते तिकीट लावूनच सर्व चित्र दाखवावे लागतील.परंतु तिथे निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलवावे लागेल. एवढा भक्कम पुरावा त्या ठिकाणी आहे, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं, तर विधानसभेत मोठा पराभव झाला, यावर देखील यावेळी वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘हे खरं आहे लोकसभेत इंडिया आघाडीचं व्यवस्थित काम झालं, त्यानंतर आमच्या अंगामध्ये विजयश्री एवढी संचारली होती की सर्व जागा तिन्ही पक्षांना वाटलं आम्हीच जिंकणार, त्यामुळे दीड महिना आम्ही चर्चेत घालवला. प्रचार आणि प्लानिंग सोडून सुमारे 40 दिवस आमचे वाया गेले, 28- 30 बैठका झाल्या, यामध्ये जो वेळ गेला त्यामध्ये आम्ही प्लॅनिंग करू शकलो नाही त्याचा नुकसान भोगावं लागलं,’ अशी कबुलीही यावेळी वडेट्टीवार यांनी दिली आहे.