Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! आम्ही शब्द पाळणार, लाडक्या बहिणींचे 1500 चे 2100 रुपये करण्याबद्दल मंत्री उदय सामंत यांच्याकडून मोठी हिंट

Ladki Bahin Yojana : उदय सामंत यांनी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम 1500 वरुन थेट 2100 रुपयांवर कधी नेणार या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय? जाणून घेऊयात..

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! आम्ही शब्द पाळणार, लाडक्या बहिणींचे 1500 चे 2100 रुपये करण्याबद्दल मंत्री उदय सामंत यांच्याकडून मोठी हिंट
Uday Samant Ladki Bahin Yojana
Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 28, 2026 | 9:47 PM

राज्यात प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या लाडकी बहिण योजनेबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी वाढवणार याचं उत्तर दिलं आहे. सध्या यो योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना प्रतिमहिना 1500 रुपये महिन्याला दिले जाताता. या योजनेतून मिळणारी रक्कम वाढवली जावी, अशी मागणी सातत्याने लाडक्या बहिणींकडून केली जाते. ही रक्कम वाढवून आता 2100 रुपये केली जाणार असल्याची चर्चा गेली अनेक दिवस सुरु आहे. पण सरकार हा निर्णय नेमका कधी घेणार हे काही अद्याप स्पष्ट होत नाही. आता एका भाषणात उद्योगमंत्री उदय सामंतांनी या रक्कम वाढविण्यावर भाष्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले उदय सामंत?

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये देण्याचा शब्द सरकार पाळणार असून, योग्य वेळी ही रक्कम दिली जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीवेळी 1500 रुपयांचे 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लाडकी बहीण योजना शंभर टक्के सुरू राहणार असून, ती कोणीही बंद करू शकत नाही, असा दावाही सामंत यांनी केला.

Loading...

वाटद (खंडाळा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात उदय सामंत बोलत होते. महिलांच्या आरोग्यासाठी आणि त्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी लाडकी बहीण योजनेचे पैसे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांना न्याय देण्याची सरकारची भूमिका असून, योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान, लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना 2024 च्या विधानसभा निवडणुकीवेळी आणण्यात आली. या योजनेने महायुतीला निवडणूक जिंकण्यात मोठा फायदा झाला, असं राजकीय विश्लेषक सांगतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही अत्यंत प्रभावी योजना ठरली आहे. ही योजना कधीही बंद होणार नाही, असं मतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अनेकदा मांडलं आहे.. आज राज्यामध्ये 1 कोटी 66 लाख 28 हजार 48 इतक्या लाडक्या बहिणी या योजनेच्या लाभार्थी आहेत. हा ताजा आकडा केवायसी प्रक्रिया पडताळणीनंतरचा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us