
शिवसेनेचे जिल्हाप्रमख महेश चिवटे आपल्या स्कॉर्पिओ कारने जात असताना त्यांच्या हिवरवाडी येथील शेतात कार आडवी घालून बेदम मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या महेश चिवटे यांनी मनोज लांडगे यांनी गावठी कट्टा आपल्यावर रोखत लोखंडी पाईपने मारहाणी केली, त्यामुळे आपण स्टिअरिंगवर बेशुद्ध होऊन पडल्याचे चिवटे यांनी म्हटले आहे.आपल्याला मारहाण करणारे दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप महेश चिवटे यांनी केला असून या प्रकरणात करमाळा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
आपण हिवरवाडी येथील शेतात जाताना असताना गाडी आडवी घालत आपल्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा आरोप महेश चिवटे यांनी केला आहे. आपल्याला मनोड लांडगे यांनी हाताने ठोसे मारत तसेच लोखंडी पाईपने वार करत जखमी केल्याचे महेश चिवटे यांनी सांगितले. आपल्यावर गावठी कट्टा रोखला गेला आणि मोबाईलने शूटींग करीत रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांची माफी माग, मी या भागातच राहतोय, तुला जीवंतच मारुन टाकेन अशा धमक्या दिल्याचे महेश चिवटे यांनी म्हटले आहे.
आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर ही गोष्ट घातली आहे, मला असे कळले की गावातील एका मुलाने असे व्हॉट्सअप स्टेटस ठेवले होते की ज्यांना माराहाण बघायची आहे त्यांनी हिवरवाडी रोडला यावे असे त्यात म्हटले होते. आपल्याला मारहाण करणारे दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांचे कार्यकर्ते आहेत. गुंड निलेश घायवळ याचे सुद्धा बागल यांच्याशी संबंध असल्याचा आरोप महेश चिवटे यांनी केला आहे. चार दिवसांपासून माझ्या रस्त्याची रेकी केली गेली त्यानंतर हा हल्ला झाल्याचे ते म्हणाले.
मकाई साखर कामगारांचे पगार द्यावे म्हणून आंदोलन केले होते, त्यावेळेस सुद्धा मला शिवीगाळ केली होती. साधारण तीन महिन्यात तीन वेळा वाद घालण्याचा प्रयत्न केला गेला आणि आज त्यांनी त्यांच्या गुंडाद्वारे आपला खून करण्याचा प्रयत्न केल्याचे महेश चिवटे यांनी म्हटले आहे. रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. आम्ही कायदा पाळणारी माणसे आहोत आणि कायद्याने चालणारी माणसं आहोत. माजी आमदार जयवंतराव जगताप शिवसेनेत आल्यामुळे आपलं महत्त्व कमी झालं आणि हे सगळं महेश चिवटे यांनी केलं आणि हा तो राग मनात धरूनच माझ्यावर हल्ला केला असा आरोप महेश चिवटे यांनी केला आहे. याबाबत करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी महेश चिवटे यांनी ठाण मांडले होते.