Sanajay Raut : खासदार फुटला तर बेलाशक तुडवा… बाळासाहेबांचाच आदेश; संजय राऊत म्हणाले, तुरुंगातही…

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठी फूट पडण्याची चिन्हे आहेत. 9 पैकी 6 खासदारांनी बंड केल्याने ठाकरे गट संकटात सापडला आहे. एकनाथ शिंदेंच्या 'ऑपरेशन टायगर'मुळे महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. दिल्लीत तातडीची बैठक होणार असतानाच संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी बंडखोरांना तीव्र इशारा दिला. राऊत प्रचंड संतापलेले दिसले, तर सावंत यांनी बाळासाहेबांच्या 'तुडवा' या विधानाची आठवण करून दिली.

Sanajay Raut :  खासदार फुटला तर बेलाशक तुडवा... बाळासाहेबांचाच आदेश; संजय राऊत म्हणाले, तुरुंगातही...
जे फुटतील, त्यांना तुडवा - संजय राऊत संतापले
| Updated on: Jun 18, 2026 | 10:54 AM

Uddhav Thackeray Shiv Sena Split : उद्धव ठाकरे यांच्या पक्षात पुन्हा एकदा मोठी फूट पडण्याची चिन्ह असून त्यांच्या 9 खालदारांपैकी 6 खासदारांनी बंड केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरमुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्याचं राजकारण आणि वातावरण दोन्हीही प्रचंड ढवळून निघालं असून त्यामुळे ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे. पक्ष फुटण्याच्या उंबरठ्यावर असतानाच आत थोड्याच वेळात दिल्लीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या खासदारांची बैठक होणार असून त्यापूर्वी संजय राऊत आणि अरविंद सांवत यांनी माध्यमांशी संवाद साधला. मात्र यावेळी संजय राऊत प्रचंड संतापले होते. बंडखोर आमदारांनाही त्यांनी खडेबोल सुनावले.

खासदार आमदार फुटला तर त्याला बेलाशक रस्त्यात तुडवा

तुम्ही लोकशाहीचा अवमान करत आहात. आमच्या पक्षावर निवडून आला. आम्ही मेहनत करतो. उद्धव ठाकरे मेहनत करत आहेत. तुम्ही त्यांना फोडत आहात. ही कोणती लोकशाही आहे? असा सवाल राऊत यांनी विचारला.  तसेच आता कोणी बेईमानी करणार असतील तर त्यांना सोडायचं नाही. त्यांच्या मतदारसंघात जाऊन राडे करायचे. कोणताही खासदार फुटला तर त्याला मोकळीक देणार नाही असं राऊतांनी खडसावलं.  यापुढे एखादा खासदार आमदार फुटला तर त्याला बेलाशक रस्त्यात तुडवा. कायदेशीर गोष्टीची पर्वा करू नका, असं बाळासाहेब म्हणाले होते, याची आठवण अरविंद सावंत यांनी करून देत तुडवण्याचा थेट इशारा दिला.

जिथे ठाकरे तिथे शिवसेना

अजूनही एसएलपी कोर्टात सुरू आहे. जिथे ठाकरे तिकडे तिथे शिवसेना.  शिंदे यांची शिवसेना कधीपासून मूळ शिवसेना झाली  ?  शिंदे फिंदे यांची शिवसेना बनली, तर उद्या कोणी म्हणेल भाजप इतर कुणाचा आहे, असा टोलाही त्यांनी लगाव . शिंदेंची शिवसेना मूळ नाही असं राऊतांनी ठणकावून सांगितलं.  ११ वाजता मिटिंग आहे. कशासाठी बोलावली आहे. साधा विषय आहे. व्हीप कशासाठी आहे. मिटिंग झाल्यावर प्रश्न विचारा. बाळासाहेबांचा आदेश आम्हाला दिला आहे, तुडवा, असं राऊतांनी स्पष्ट सांगितलं.

Follow Us