Shivsena Symbol Dispute : एकनाथ शिंदेंनी पक्षातून बंडखोरी का केली? शिवसेना शिंदे गटाच्या वकिलाचा सुप्रीम कोर्टात थेट मोठा दावा
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव कोणाच यावर पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे. यावेळी युक्तिवाद करताना शिवसेना शिंदे गटाच्या वकिलाकडून कोर्टात मोठा दावा करण्यात आला आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव कोणाच यावर पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडून कोर्टात युक्तिवाद करण्यात आला होता. शिवसेना ठाकरे गटाची बाजू मंडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला होता. दरम्यान आता शिवसेना शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल हे शिवसेना शिंदे गटाची बाजू मांडत आहे, यावेळी त्यांनी न्यायालयात मोठा दावा केला आहे. पक्षात एकाधिकारशाही सुरू होती, कोणाला आवाज उठवता येत नव्हता, म्हणून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली असा दावा यावेळी कौल यांनी केला आहे.
काय आहे कौल यांचा नेमका दावा?
शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह शिवसेना शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने काय एका रात्रीमधून घेतला नाही, त्यांनी सर्व मुद्द्यांचा अभ्यास केला. बैठका घेतल्या भूमिका जाणून घेतल्या. शिवसेना ठाकरे गट देखील अनेकदा आयोगाकडे गेला, कोर्टात गेला. त्यानंतर हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं. क्षात एकाधिकारशाही सुरू होती, कोणाला आवाज उठवता येत नव्हता, म्हणून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली असा दावा यावेळी कौल यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटातून उठाव केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. पक्षात दोन गट निर्माण झाले, एक म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि दुसरा शिवसेना ठाकरे गट. त्यानंतर दोन्ही गटाच्या वतीने पक्षाचं चिन्ह आणि नावावर दावा करण्यात आला. अखेर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं चिन्ह हे शिवसेना शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शिवसेना ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. याच प्रकरणावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. आधीच्या सुनावणीमध्ये शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला होता. त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाकडून कोर्टात आपली बाजू मांडण्यात आली आहे.