मोठी बातमी! भाजपासह शिवसेना शिंदे गटाला उद्धव ठाकरे यांचा थेट धक्का, अज्ञातस्थळी…

Municipal elections 2026 : राज्यातील महापालिकेच्या निवडणुका झाल्या असून भाजपा महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र, असे असले तरीही राज्यात महापाैरपदावरून फोडाफोडीचे राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! भाजपासह शिवसेना शिंदे गटाला उद्धव ठाकरे यांचा थेट धक्का, अज्ञातस्थळी...
Uddhav Thackeray
| Updated on: Jan 19, 2026 | 10:12 AM

राज्यातील महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून आता सर्वच महापालिकांवर महापाैरपदासाठी रस्सीखेच बघायला मिळत आहे. हेच नाही तर महापाैरपद आपल्यालाच मिळावे, याकरिता प्रयत्न केली जात आहे. फक्त मुंबईच नाही तर अनेक महापालिकांवर महापाैरपदासाठी फोडाफोडीचे राजकारण सध्या सुरू झाल्याचे बघायला मिळत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपले नगरसेवक फुटणार नाहीत, याचीही काळजी घेतली जात आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने एकत्र येऊन लढली होती. मात्र, आता महापाैरपदावरून दोन्ही पक्षात रस्सीखेच बघायला मिळत आहे. मुंबई महापालिकेतही महापाैर पदाच्या मुद्द्यावरून रस्सीखेच बघायला मिळत असतानाच आता कल्याण डोबिंवली महापालिकेतही घडामोडींना प्रचंड वेग आला.

मुंबईनंतर कल्याण डोंबिवली महापालिकेतही नगरसेवक फोडाफोडीचे राजकारण रंगताना दिसत आहे. कल्याण डोबिंवली महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना भाजपा आणि मनसेसोबतच शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यादरम्यान ठाकरे गटाच्या 9 नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवण्यात आल्याचे कळतंय. कल्याण डोबिंवली महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी 62 मते असणे आवश्यक आहे.

भाजपाकडे 50 नगरसेवक आहेत तर शिंदेंच्या शिवसेनेकडे 53 नगरसेवक आहेत. दोन्ही पक्षांकडून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. शिवसेना ठाकरे गटाचे 11 आणि मनसेचे 5 नगरसेवक कल्याण डोंबिवली महापालिकेत निवडून आले आहेत. महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरला असून अनेक महापालिकांमध्ये भाजपाची एकहाती सत्ता आली.

मुंबई महापालिकेवर सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरला तर कल्याण डोंबिवलीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष भाजपा ठरला आहे. मुंबई महापालिकेच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात तणावाचे वातावरण आहे. अडीच वर्ष महापाैरपद शिंदेंनी मागितले आहे. नक्की दोन्ही पक्ष मिळून काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याच्या नजरा आहेत. मात्र, शिंदे गटाने महापाैर पदावर दावा केला आणि आपले 29 नगरसेवक थेट ताज लॅन्ड हॉटेलमध्ये ठेवले आहेत. पुढील काही दिवसात घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.