मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू
मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचा अपघात झाला आहे. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील चांदे-मूलखेड रस्त्यावर रिक्षा आणि फॉर्च्युनर गाडीची धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.

पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील चांदे-मूलखेड रस्त्यावर रिक्षा आणि फॉर्च्युनर गाडीची धडक झाली आहे. या भीषण अपघातामध्ये रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर फॉर्च्युनरमधील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे यांचा देखील समावेश आहे. या अपघातामध्ये प्रकाश भेगडेंच्या डोक्याला दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, या अपघातामधील जखमी लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं प्रचंड नुकसान झालं आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याच्या मुळशी तालुक्यातील चांदे-मूलखेड रस्त्यावर रिक्षा आणि फॉर्च्युनर गाडीची धडक झाली आहे. या भीषण अपघातामध्ये रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. विकास अर्जुन पारखी असं मृत्यू झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. तर या अपघातामध्ये फॉर्च्युनरमधील तिघे जण जखमी झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे देखील या अपघातामध्ये जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली, स्थानिकांनी या अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल केलं.
गुन्हा दाखल
दरम्यान या अपघात प्रकरणात मुळशीतील पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिमन्यू अर्जुन पारखी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर फॉर्च्युनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान
दरम्यान हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. रिक्षा आणि फॉर्च्युनरची धडक झाली. या अपघातामध्ये दोन्ही वाहन मोठ्या प्रमाणात डॅमेज झाले आहेत. तर या अपघातामध्ये रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. रिक्षाचालकाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.