AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात श्रीमंत अन् गरीबाला वेगळा न्याय; आमदार संजय गायकवाड धमकी प्रकरणात प्रशांत आंबींची नाराजी, घेतला मोठा निर्णय

prashant ambi case : संजय गायकवाड धमकी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी आता जिल्हा सत्र न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात श्रीमंत अन् गरीबाला वेगळा न्याय; आमदार संजय गायकवाड धमकी प्रकरणात प्रशांत आंबींची नाराजी, घेतला मोठा निर्णय
| Updated on: Jul 10, 2026 | 12:08 PM
Share

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड धमकी प्रकरणात कोल्हापूर सर्किट बेंच आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रकाशक प्रशांत आंबी यांनी नाराजी दर्शवली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाईला गती मिळत नसल्याने नाराजी दर्शवली आहे. त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिलेल्या धमकीचा खटला आता जिल्हा सत्र न्यायालयात चालणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुरू असलेला खटला विड्रॉल करण्याच्या सर्किट बेंचकडून सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूर सर्किट बेंचने घेतलेल्या भूमिकेबद्दल आंबी कुटुंबीयांची नाराजी दर्शवली आहे. संजय गायकवाड यांच्या चौकशीला जिल्हा सत्र न्यायालयाने परवानगी देऊनही अद्याप त्यांना चौकशीसाठी बोलावलं नसल्याचा दावा प्रशांत आंबी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केला आहे.

कोल्हापूर सर्किट बेंचच्या भूमिकेनंतर आंबी यांनी आता जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवीगाळ आणि धमकी प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करून घेण्यासाठी आंबी कुटुंबीयांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती. या संपूर्ण प्रकरणावर प्रशांत आंबी म्हणाले, आम्ही जिल्हा न्यायालयात येत्या दोन-तीन दिवसांत खटला दाखल करत आहोत. पोलिसांनी या प्रकरणात चौकशी केलेली नाही. ज्याच्यावर अन्याय झाला, त्याच्या बाजूने पोलिसांनी राहायला हवं. पण माझ्या प्रकरणात सुरुवातीपासूनच पोलीस हे आरोपींच्या बाजूने राहिले आहेत. त्यामुळे दीड महिन्यात न्यायालयाने आदेश देऊनही पोलिसांनी कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही. गरीबाला वेगळा न्याय आहे. तर श्रीमंताला वेगळा न्याय आहे. ज्याची सत्ता आहे, त्याला वेगळा न्याय आहे. ज्याची सत्ता नाही, त्याला वेगळा न्याय आहे. आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढाई लढत राहू, असा निश्चय सुरुवातीपासूनच केला आहे’.

प्रशांत आंबी यांची पोस्ट जशीच्या तशी

प्रशांत आंबी यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, ‘शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या शीर्षकावरून मध्यरात्री मला फोन करून शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी, महामानवांच्या नावावरून शिवीगाळ, रोज 100 पुरुष घरी येतील अशी माझ्या कुटुंबाला बलात्काराची धमकी देणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात हायकोर्टात आम्ही रीटपिटीशन दाखल केली होती. ती आमच्या वकिलांना Withdraw करायचा सल्ला हायकोर्टाने दिलाय. आमदार संजय गायकवाड यांच्यावर त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल दखलपात्र गुन्हा नोंदवावा, एवढीच आमची मागणी होती. हायकोर्ट आमचा आवाज ऐकेल, असं वाटलं होतं. पण त्यांनी प्रक्रियावादी निर्णय दिला आहे’.

‘गायकवाड यांनी केलेल्या फोननंतर सुद्धा मला अनेक धमक्यांचे फोन आलेले होते. प्रशांत आंबीला पाकिस्तान-चीनमधून फंडिंग येतं. त्याची संपत्ती राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करा. तो नक्षलवादी आहे, राष्ट्रद्रोही आहे, विकृत प्रकाशक आहे, अशा पद्धतीची बदनामी आमदार गायकवाड आणि त्यांचे समर्थक करत आहेत. माझी चूक काय? तर मी फक्त अन्यायाविरोधात लढतोय. जिल्हा न्यायालयाने चौकशीची परवानगी देऊनसुद्धा पोलिसांनी आमदार संजय गायकवाड यांची कोणत्याही प्रकारची चौकशी केलेली नाही. लढाई सुरु राहील, असेही त्यांनी नमूद केली.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ