Eknath Shinde : एकनाथ शिंदे त्यांचा मोबाइल ब्रिटिश एअरवेजच्या विमानातच विसरलेले, पोलिसांची एकच पळापळ
Eknath Shinde : शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लंडन दौऱ्यावर गेले होते. रविवारी पहाटे ते मुंबईत परतले. पण यावेळी एक घटना घडली, ज्याची सगळीकडे चर्चा आहे.

गिरीश गायकवाड, प्रतिनिधी : शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लंडन दौऱ्यावर गेले होते. रविवारी पहाटे ते मुंबईत परतले. पण यावेळी एक घटना घडली, ज्याची सगळीकडे चर्चा आहे. एकनाथ शिंदे मुंबई विमानतळावर उतरुन घरी आल्यानंतर मोबाइल विमानातच राहिल्याचं त्यांच्या लक्षात आलं. हा मोबाइल शोधण्यासाठी पोलिसांना चांगलीच पळापळ करावी लागली झाली. शिंदे यांनी लंडनहून मुंबईपर्यंत ब्रिटिश एअरवेजने प्रवास केला. विमानतळावरून घरी आल्यानंतर मोबाइल जवळ नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. सुरक्षाव्यवस्थेला तातडीने याची माहिती देण्यात आली. विमानतळावरील ब्रिटिश एअरवेजच्या सुरक्षा कार्यालयाशी पोलिसांनी संपर्क साधला. शिंदे यांचा मोबाइल विमानतळावर सापडला. त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. एकनाथ शिंदे एका खास कार्यक्रमासाठी इंग्लंड दौऱ्यावर गेले होते. तिथे आतापर्यंत केलेल्या कार्यासाठी एकनाथ शिंदेंचा विशेष सन्मान करण्यात आला.
एकनाथ शिंदे यांनी दोन्हीवेळा ब्रिटिश एअरवेजच्या विमानाने लंडन प्रवास केला. जाताना स्वित्झर्लंडच्याय झुरीचमध्ये त्यांनी स्टॉप घेतलेला. पण परतताना सलग नऊ तासांचा प्रवास होता त्यांचं विमान रात्री 2 च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड झालं. विमानतळावर शिंदेंच्या स्वागतासाठी प्रकाश सुर्वे, मुरजी पटेल, तुकाराम काते हे आमदार आणि कार्यकर्ते जमले होते. विमानतळावर उतरल्यानंतर शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. हार-तुरे स्वीकारण्यात आले. शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला.
झटपट सूत्रं फिरली
या सगळ्या धावपळीत घरी पोहोचल्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास मोबाइल नसल्याचं एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आलं. लगेच या बद्दल पोलिसांना कळवण्यात आलं. झटपट सूत्रं फिरली. अखेर तासाभरातने पहाटे चारच्या सुमारास पोलिसांनी एकनाथ शिंदेंकडे मोबाइल पोहोचवला.
गौरी-गणपती उत्सवासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री उशिरा मूळ गावी दाखल
गौरी-गणपती उत्सवासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री उशिरा मूळ गावी दाखल झाले आहेत. आज दिवसभर सातारा दरेगावात त्यांचा मुक्काम असणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ते कुटुंबासमवेत गणेशोत्सवाचा आनंद घेण्यासाठी मूळ गावी उपस्थित राहिले आहेत. शिंदे आज दिवसभर दरेगावात थांबून पारंपरिक पद्धतीने गौरी-गणपती पूजन व स्थानिक नागरिकांशी संवाद साधणार आहेत.