
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आल्याची चर्चा होती. महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेच्या जागावाटपावरून सुरू असलेली धूसफूस थेट शिवसेना (UBT) पक्षाच्या अंतर्गत संघर्षात रूपांतरित झाल्याचीही चर्चा होती. पक्षाच्या हक्काची जागा राष्ट्रवादी काँ ग्रेसला (शरद पवार गट) सोडल्यामुळे आदित्य ठाकरेंनी तीव्र संताप व्यक्त केल्याचं बोललं जात होतं. यावरून प्रश्न विचारण्यात आला असता संजय राूत यांनी कोणताही आडप़डदा न ठेवता स्पष्ट उत्तर दिलं.
माझ्यात आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये कसले मतभेद असणार ? या अत्यंत चुकीच्या बातम्या आहेत. तुम्ही ज्या प्रकारच्या सुरस बातम्या छापताय, पण कोणीतरी या विषयावर मला फोन करून विचारलं का, किंवा आदित्य ठाकरे यांना विचारलं का. मुळात जी बैठक झाली त्याला मी उपस्थित नव्हत, माझ्या पुस्तकाच्या कार्यक्रमासाठी मी दिल्लीत होतो. मी जन्मापासून या पक्षात आहेत. या पक्षात खासदार व्हायला आलो नाही. अनेक वर्ष मी खासदार असलो तरी शिवसैनिक म्हणून काम करतो, बाळासाहेबांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेता येईलय या विचाराने काम करणारा मी सामान्य सैनिक आहे. मी स्वत:ला शिवसैनिक मानतो. माझा दोष इतकाच की माझं मतं मी परखड पणे मांडतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.
एखाद्या माणसाला कधीतरी एखाद्या पदाचा निरोप घ्यावा लागतो, त्याची मानसिक तयारी ठेवली पाहिजे. आम्हाला असं वाटलं की मा. उद्धव ठाकरे हे आणखी 15 वर्षं मुख्यमंत्री रहायला पाहिजे होते, दुर्दैवाने त्यांना कमी काळ मिळाला. नियतीच्या मनात काय आहे कोणी सांगू शकत नाही.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार का?
2029 साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील का, असा सवाल पत्रकाराने विचारल्यावर संजय राऊतांनी दिलेल्या उत्तराची सर्वत्र चर्चा होत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री का नसतील ? आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करू. आम्ही खासदार आहोता का की आमदार आहोत का हे विसरून पक्षावर जे फोडाफोडीचं,पळवापळवीचं संकट आहे ते रोखून एक मजबूत संघटन उभं करून पुन्हा एकदा महाराष्ट्रात जनतेसमोर जाणं आणि या सरकारविरुद्ध संघर्ष करणं ही आमची प्राथमिकता आहे, असं राऊत म्हणाले.
2029 साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करू. माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा प्रयत्न असेल कि सत्ता शिवसेनेकडे यावी आणि नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी करावं अशी आमची इच्छा आहे, असंही राऊत म्हणाले.
मी शिवसेना सोडणार नाही
संजय राऊत हे लवकरच शिवसेना (ठाकरे गट) सोडणार असं तुमचे काही हितचिंतक सांगत आहेत. या प्रश्नावर राऊत यांनी सडेतोड उत्तर दिलं. मी या पक्षासाठी घाम गाळला आहे, रक्त वाहिलं आहे. त्यामुळे काही झालं तरी पक्ष आम्ही सोडणार नाही. हा विचारही माझ्या मनाला कधी शिवला नाही, असं राऊतांनी ठणकावून सांगितलं.
बुवाबाजीला नामवंत लोकांमुळे प्रतिष्ठा
यावेळी राऊतांनी खरात प्रकरणावरही भाष्य केलं. अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती वाढतच चालली आहे, कोज नवे गुन्हे दाखल होत आहेत, महाराष्ट्राची प्रतिमा देशात मलीन झाली आहे. राजकारणी, नामवंत, बुवाबाजीच्या नादी लागले आहेत यावरून प्रश्न विचारण्यात आला असता शिवेसना खासदार संजय राऊत यांनी थेट उत्तर दिलं. बुवाबाजील प्रतिष्ठा नामवंतच देतात, सामान्य माणूस बुवाबाजील प्रतिष्ठा देता. सत्ताधारी, मंत्री संत्री हेच बुवाबाजीला प्रतिष्ठा देतात, त्याचं जाणं येणं वाढतं, आणि बुवांना प्रतिष्ठा मिळते असं राऊतांनी सुनावलं.