
“जेव्हा जेव्हा पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीची तारीख जवळ येते. तेव्हा यांचे पाय लटपटतात आणि हे दिल्लीत जातात. त्यांचे मालक दिल्लीत असल्याने यांना जावं लागतं. कधी अमित शाहांना भेटतात, कधी मोदींना भेटतात. बाकी त्यात काहीही नाही”, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. यावेळी संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबद्दल मोठा गौप्यस्फोट केला.
संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावरुन संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट भाष्य केले. “प्रादेशिक पक्षाची मुख्य पक्षाचे कार्यालय हे राज्यात असतात. दिल्लीत नसतात. यांचे मालक दिल्लीत असल्याने यांना जावं लागत. ते दिल्लीत का जातात किंवा का गेले, जेव्हा जेव्हा पक्ष आणि सुनावणीची तारीख जवळ येते, तेव्हा यांचे पाय लटपटतात आणि हे दिल्लीत जातात. कधी अमित शाहांना भेटतात, कधी मोदींना भेटतात. बाकी त्यात काहीही नाही, असे संजय राऊत म्हणाले.
जेव्हा जेव्हा पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीची तारीख जवळ येते, तेव्हा यांच्या दिल्लीतील भेटीगाठी वाढतात, गृहमंत्री अमित शाहांना भेटतात, रडगाणं गातात, छाती पिटतात आणि परत येतात. मोदी आणि शाहांना शिंदेंची जमिनीवरील ताकद किती आहे, हे त्यांना माहिती आहे. त्यांनी एकनाथ शिंदेंना आमच्या विरुद्ध महाराष्ट्राच्या विरुद्ध वापरुन घेतलं. अमित शाहांचा आणि मोदींचा त्यांना थेट सल्ला आहे की महापालिका निवडणुका झाल्यावर तुम्हाला तुमचा पक्ष हा भाजपात विलीन करावा लागेल. यात सत्य आहे, असा खुलासा संजय राऊत यांनी केला.
कारण कोणत्याही परिस्थिती कोणत्याही कायद्याच्या आधारे ते सर्वोच्च न्यायलयात आपला बचाव करु शकत नाही. हे सर्वांना माहिती आहे. तसा प्रयत्न झाला तर जगाचा भारतीय न्यायाव्यवस्थेवरील विश्वास उडेल. आता भारताचे संविधान, लोकशाही याबद्दल जगाच्या मनात शंका उत्पन्न झाल्या आहेत. त्यात सर्वोच्च न्यायलयातील शिवसेनेचे प्रकरण हे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे हे लटपटलेल्या अवस्थेत मोदींना भेटले, असे संजय राऊत म्हणाले.